बाजारात अ‍ॅसिड मिळतं का? दीपिकाने असं समोर आणलं धक्कादायक वास्तव

बाजारात अ‍ॅसिड मिळतं का? दीपिकाने असं समोर आणलं धक्कादायक वास्तव

छपाक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणने अॅसिड विक्रीबाबत एक स्टिंग ऑपरेशन केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone)चा नुकताच छपाक सिनेमा प्रदर्शित झाला. अ‍ॅसिड अ‍ॅटेकवर (Acid Attack) वर जोरदार भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातील एका वाक्यानं लोकांची मन जिंकली मात्र सत्य परिस्थिती मात्र वेगळीच होती. देशभरात महिलांवर होणाऱ्या अ‍ॅसिड हल्ल्यावर भाष्य करणाऱ्या छपाक या चित्रपटात अॅसिड विकलं गेलंच नाही तर तरुणींवर फेकलं जाणार नाही असा एक संवाद आहे. या संवादालाच प्रत्यक्षात पडताळण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणने एक टीम तयार करून स्टींग ऑपरेशन केलं.

दीपिकाने आपली एक टीम तयार केली. ह्या टीममधील प्रत्येक मेंबर वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवण्यात आले. प्रत्येकाला दुकानातून अॅसिड मागण्यासाठी सांगण्यात आलं. या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक बाब समोर आली आहे. एका दिवसात जवळपास 24 अ‍ॅसिडच्या बाटल्या या टीमला मिळाल्या. या पैकी फक्त एका दुकानदारानं आयडी विचारलं होतं. बाकी सगळ्या दुकानात विना आयडी सऱ्हासपणे अ‍ॅसिड विकलं जात होतं. काही ठिकाणी अ‍ॅसिडसाठी ज्यादा पैसे मोजण्यास दुकानदार सांगत होते. तर अ‍ॅसिडमुळे काय होतं याचा अवेरनेसही तरुणांना अ‍ॅसिड देताना सांगत असल्याचं या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसत आहे.

सगळ्यात मोठी धक्कादायक बाब ही की अ‍ॅसिड विकणाऱ्या आणि घेणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी आयडी कार्ड विचारणं आवश्यक आहे. याचा अभाव होता. याशिवाय अनेकांना अ‍ॅसिडच्या बाटल्या दुकानदारांनं दिल्याही त्यावर आजूबाजूच्य़ा नागरिकांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. सुप्रीम कोर्टानं अ‍ॅसिड विकण्याच्या नियमावर लावलेल्या निर्बंधांना डावलून सऱ्हासपणे अ‍ॅसिडची विक्री केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.

View this post on Instagram

Acid has corroded many lives, crushed many dreams, dashed many hopes and scarred many futures. #WontBuyWontSell #Chhapaak @vikrantmassey87 @meghnagulzar @atika.chohan @shankarehsaanloy #Gulzar @_kaproductions @mrigafilms @foxstarhindi

A post shared by Malti (@deepikapadukone) on

अ‍ॅसिड खरेदी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार तरुणाचं वय 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. अ‍ॅसिड घेणाऱ्या तरुणाला आयडी कार्ड आणि घरचा पत्ता माहीत असणं बंधनकारक आहे. दुकानदारांजवळ अ‍ॅसिड विकण्याचं (Acid Sale) लायसन असणं आवश्यक आहे. त्यासोबतच पोलिसांनाही या संदर्भातील माहिती देणं आवश्यक आहे. या सर्व नियमांना बगल देत काही ठिकाणी आजही सऱ्हाइतपणे अ‍ॅसिडची विक्री ज्यादा दाम घेऊन केली जाते. इतकच नाही तर अॅसिड खरेदी करणाऱ्या आणि देणाऱ्याला शेजारचे नागरिकही सजक होऊन कोणताही प्रश्न उपस्थित करत नाहीत. हे धक्कादायक वास्तव अभिनेत्री दीपिका पदुकोणनं केलेल्या स्टींक ऑपरेशनमधून समोर आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2020 05:26 PM IST

ताज्या बातम्या