S M L

दीपिका पदुकोणनं कतरिना कैफशी वाढवली मैत्री, कारण...

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबईत दणक्यात झालं. बाॅलिवूड हस्तींनी या सोहळ्याला हजेरी लावली खरी, पण चर्चा होती एकाच व्यक्तीची. ती म्हणजे कतरिना कैफची.

Updated On: Dec 6, 2018 10:33 AM IST

दीपिका पदुकोणनं कतरिना कैफशी वाढवली मैत्री, कारण...

मुंबई, 6 डिसेंबर : दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबईत दणक्यात झालं. बाॅलिवूड हस्तींनी या सोहळ्याला हजेरी लावली खरी, पण चर्चा होती एकाच व्यक्तीची. ती म्हणजे कतरिना कैफची.


कतरिना या रिसेप्शनला उपस्थित होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता. मध्यंतरी दीपिका-कतरिनामध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघींचे बाॅयफ्रेंडही सारखेच होते. रणबीर कपूर अगोदर दीपिकासोबत होता. नंतर कतरिनासोबत. त्यामुळे साहजिकच दोघांचं एकमेकींशी फारसं सख्य नव्हतं.आता मात्र दीपिकानंच कतरिनाकडे मैत्रीचा हात पुढे केलाय. दीपिकानं कतरिनाला इन्स्ट्राग्रामवर फाॅलो करायला सुरुवात केलीय. कॅटचा व्होग मासिकावरचा फोटोही दीपिकानं लाइक केलाय.


Loading...

आता कतरिना दीपिकाला फाॅलो करते का ते पाहायचं. पण करण जोहरच्या शोमध्ये कतरिनानं दीपिकाबद्दल मनात कसलीच अढी नसल्याचं म्हटलं होतं.


दीपिकापेक्षा कतरिनाच्या ब्रेकअपचा सगळ्यांना धक्का बसला होता. दोघं सहा वर्ष एकत्र होते. अगदी काही महिने एकत्र राहत होते. अगदी दोघांचं लग्न होणार, अशी चर्चाही होती.


कतरिना पहिल्यांदाच व्होग मासिकाशी बोलताना म्हणाली, आपण एखाद्या व्यक्तीवर फोकस करतो, आपला आनंद त्याच्यात शोधत असतो. तेव्हा स्वत:कडे पहात नाही.


पुढे ती म्हणाली, ' आता मी माझ्याकडेच नीट पाहू शकते. माझ्याच अनेक गोष्टींचा विचार करू शकते. म्हणूनच ब्रेकअप माझ्यासाठी मोठा आशीर्वाद ठरलंय.

दीपिका आणि कतरिना दोघांचंही रणबीरबरोबर ब्रेकअप झालं. दोघींनाही खूपच मानसिक त्रास झाला. दीपिकाही डिप्रेशनमध्ये गेली होती. कतरिना आता मात्र एकदम पुढे गेलीय. आपल्या कामावरच ती सर्व लक्ष केंद्रित करतेय.">

दीपिका आणि कतरिना दोघांचंही रणबीरबरोबर ब्रेकअप झालं. दोघींनाही खूपच मानसिक त्रास झाला. दीपिकाही डिप्रेशनमध्ये गेली होती. कतरिना आता मात्र एकदम पुढे गेलीय. आपल्या कामावरच ती सर्व लक्ष केंद्रित करतेय.


दोघांच्या ब्रेकअपनंतर जग्गा जासूस रिलीज झाला होता. त्यावेळीही कतरिना प्रमोशनच्या वेळी प्रोफेशनलच वागली होती.


नवरा असावा कसा, सांगतेय हर्षदा खानविलकर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 10:33 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close