Home /News /entertainment /

दीपिका पादुकोणने शेअर केली ऑडिओ क्लिप ; या दिवशी होणार Gehraiyaan Trailer रिलीज

दीपिका पादुकोणने शेअर केली ऑडिओ क्लिप ; या दिवशी होणार Gehraiyaan Trailer रिलीज

दीपिकाच्या आगामी ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या सिनेमासाठी चाहत्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण दीपिकानं सोशल मीडिया पोस्ट करत या सिनेमाचा ट्रेरल कधी रिलीज होणार आहे याबद्दल माहिती दिली आहे.

  मुंबई, 19 जानेवारी- दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दीपिकाच्या आगामी ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या सिनेमासाठी चाहत्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण दीपिकानं सोशल मीडिया पोस्ट करत या सिनेमाचा ट्रेरल कधी रिलीज होणार आहे याबद्दल माहिती दिली आहे. या सिनेमातून दीपिका डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. त्यामुळे तिच्यासाठी तर हा सिनेमा खास आहेच शिवाय चाहत्यांसाठी देखील तितकाच खास आहे. या दिवशी होणर  Gehraiyaan Trailer  रिलीज दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टावर एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये ती हिंदीमध्ये म्हणत आहे की, इमोशन्स और गहरे हो जाएंगे जब हम दुनिया की इस गहराई में गोता लगाएंगे. जेव्हा आयुष्याच्या या खोलीत ढुबकी माराल तेव्हा भावना आधिक दृढ होतील...असं काहीसं ती यात म्हणताना दिसत आहे. या क्लिपच्या माध्यमातून दीपिकाने माहिती दिली आहे की, ‘गहराइयां’ चा ट्रेलर उद्या 20 जानेवारीला रिलीज होणार आहे. वाचा-काय म्हणता ! प्रिया मराठे भाजी घेण्यासाठी चक्क बाजारात,काय घेतलं ते पाहा.. दीपिकासोबत अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदीने(Siddhant Chaturvedi) देखील आपआपल्या पद्दतीने एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.यामधून त्यांनी ‘गहराइयां’ च्या ट्रेलरचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी पूर्ण झाले आहे. गहराइयां हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर (Amazon Prime Video)प्रदर्शित होणार आहे.दीपिकाने तिच्या चाहत्यांसाठी गहराइयां या सिनेमाचे सात पोस्टर 5 जानेवरी म्हणजे तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केले होते. यामध्ये दीपिका सिद्धांत चतुर्वेदीला किस करताना दिसली होती. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये अनन्या पांडे दिसत आहे. या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.
  दीपिकाचे ओटीटीवर पदार्पण गहराइयां हा सिनेमा यापूर्वी 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आता हा सिनेमा 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. अनेक सिनेमांच्या रिलीड डेटमध्ये कोरोनामुळे बदल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता हा सिनेमा डायरेक्ट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिकाच्या फॅन्ससाठी ही पर्वणीच असणार आहे. यानिमित्त दीपिकाचे ओटीटीवर पदार्पण होणार आहे. चाहते यासाठी उत्सुक आहेत. दीपिकाच्या या पहिल्या डिजिटल डेब्यूला चाहते कसा प्रतिसाद देणार याची देखील उत्सुकता आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Ananya panday, Bollywood News, Deepika padukone, Entertainment

  पुढील बातम्या