S M L

Chhapaak: कंगना रणौतच्या बहिणीवर झाला होता अ‍ॅसिड अटॅक, ट्वीट करत म्हटले असे काही...

हा सिनेमा पुढच्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण आणि सैफ अली खान यांचा 'तानाजी- द अनसंग वॉरिअर' आणि दीपिकाचा छपाक सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 08:17 PM IST

Chhapaak: कंगना रणौतच्या बहिणीवर झाला होता अ‍ॅसिड अटॅक, ट्वीट करत म्हटले असे काही...

मुंबई, २५ मार्च- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आगामी 'छपाक' सिनेमाचा फर्स्ट लूक आज प्रदर्शित करण्यात आला. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमातील तिचा लूक प्रदर्शित केला. दीपिकाचा हा आगामी सिनेमा लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर बेतलेला आहे. लक्ष्मीवर अ‍ॅसिड अटॅक करण्यात आला होता. यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. तिच्या याच आयुष्यावर हा सिनेमा भाष्य करणार आहे. दीपिकाच्या सिनेमातील लूकबद्दल बोलायचे झाले तर दीपिका बहुतांशी लक्ष्मीसारखीच दिसते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेलनेही ट्वीट करत दीपिकाच्या लूकचं भरभरून कौतुक केलं आहे. रंगोलीने लिहिले की, ‘जगात कितीही अन्याय किंवा भेदभाव असो, ज्यांचा आपण द्वेष करतो त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर कधीच देऊ नये. हा लूक फारच कौतुकास्पद आहे. दीपिका पदुकोण आणि मेघना गुलझार एक अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर म्हणून मी या सिनेमाची सर्वात मोठी चीअर लीडर आहे. छपाक.’ रंगोलीच्या या ट्वीटला खूप लाइक आणि शेअरही केलं जात आहे.Loading...

आजपासून म्हणजे २५ मार्चपासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. हा सिनेमा पुढच्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण आणि सैफ अली खान यांचा 'तानाजी- द अनसंग वॉरिअर' आणि दीपिकाचा छपाक सिनेमा एकाच दिवशी म्हणजे १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. अजय- सैफच्या या अक्शन ड्रामा सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सारखीच असल्यामुळे कोणता सिनेमा या शर्यतीतून काढता पाय घेतो हेच पाहावं लागणार आहे.

छपाक सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलझार करणार आहेत. सिनेमात दीपिकाचं नाव मालती असणार आहे. गेल्यावर्षी २५ जानेवारीला दीपिकाचा 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित झाला होता. यानंतर तिने एकही सिनेमा साइन केला नाही.

VIDEO : बारामतीच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांच्याबद्दल सुप्रिया सुळे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 08:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close