मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दीपिकाने Bold Bikini फोटो शेअर करत केली चित्रपटाची घोषणा, सोशल मीडियावर चर्चा

दीपिकाने Bold Bikini फोटो शेअर करत केली चित्रपटाची घोषणा, सोशल मीडियावर चर्चा

दीपिकाने इंस्टाग्रामवर 5 फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने ती सोमवारी शकुन बत्राच्या (Shakun Batra) चित्रपटाची घोषणा करणार असल्याच लिहिलं आहे.

दीपिकाने इंस्टाग्रामवर 5 फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने ती सोमवारी शकुन बत्राच्या (Shakun Batra) चित्रपटाची घोषणा करणार असल्याच लिहिलं आहे.

दीपिकाने इंस्टाग्रामवर 5 फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने ती सोमवारी शकुन बत्राच्या (Shakun Batra) चित्रपटाची घोषणा करणार असल्याच लिहिलं आहे.

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : अभिनेत्री दीपिका पदुकोण ( Deepika Padukone) सोशल मीडियावर ( social media) सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओमुळे ती सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय ठरत असते. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर ( Instagram account) काही फोटो शेअर केले असून आज, सोमवारी (20 डिसेंबर) एका चित्रपटाची घोषणा करणार असल्याचं तिने म्हटलं आहे.

दीपिकाने इंस्टाग्रामवर 5 फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने लिहिलं आहे, की ती सोमवारी शकुन बत्राच्या ( Shakun Batra) चित्रपटाची घोषणा करणार आहे. तिचा हा फोटो खूपच बोल्ड आहे. फोटोमध्ये दीपिका सिद्धांत चतुर्वेदीसह ( Siddhant Chaturvedi) गोव्याच्या ( Goa) समुद्रकिनारी ( beach) बसलेली दिसत आहे. फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची ब्रालेट आणि बिकिनी घातल्याचं दिसत असून, यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

OMG! रणवीर सिंहच्या आऊटफिट्सची पत्नी दीपिकानं उडवली खिल्ली; म्हणाली तू तर....

दीपिका समुद्रकिनाऱ्यावर बसलेली दिसत आहे. ती सिद्धांतकडे, तर सिद्धांत तिच्याकडे पाहत असल्याचं एका फोटोमध्ये दिसत आहे. तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावरच्या सौंदर्याचा आनंद घेताना दिसतेय. एका फोटोमध्ये ती कॅमेऱ्याकडे पाहत असताना दिसत असून याच फोटोमध्ये सिद्धांतची पाठ दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमधील एक फोटो मुंबईचा आहे. एका फोटोमध्ये दीपिका, अनन्या पांडे आणि रजत कपूर दिसत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहेत.

'फक्त 5 दिवस बाकी' म्हणत Hruta Durguleचा बॉयफ्रेंड प्रतिकसोबत Romantic अंदाज

दीपिकाने हे फोटो करण जोहर, शकुन बत्रा, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि इतरांनाही टॅग केलेत. तिचे हे फोटो व्हायरल झाले असून, त्यांना आतापर्यंत 9 लाख 63 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तिचा बोल्डनेस बघून नेटकऱ्यांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत.

'होय, खूप प्रतीक्षा झाली आहे; पण तुम्ही एखाद्या गोष्टीची जितकी जास्त वाट पाहाल आणि जेव्हा ती गोष्ट होते, तेव्हा तुम्हाला खूप बरं वाटतं. मला वाटतं ही बाब योग्यच आहे. मी आज एका जादुई गोष्टीचा भाग बनल्याचं सर्वांना सांगते आहे. यासाठी मी सर्वांचे आभार मानते आणि लवकरच मी हे सारं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आम्ही उद्या याबाबत घोषणा करणार आहोत.' असं कॅप्शनही तिने फोटो शेअर करत दिलं आहे. दीपिकाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.

First published:

Tags: Deepika padukone