'तू सर्वात बेस्ट आहेस' असं म्हणत दीपिकानं कोणाचं केलं कौतुक? पाहा PHOTO

'तू सर्वात बेस्ट आहेस' असं म्हणत दीपिकानं कोणाचं केलं कौतुक? पाहा PHOTO

या फोटोवरून दीपिकाकडे काही गुड न्यूज असल्याचा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मे : अभिनेत्री दीपिका पदुकोन नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. सध्या देशभरात लॉकडाऊन असल्यानं दीपिका तिचा नवरा रणवीरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. अशात ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. नेहमीच काही ना काही फोटो किंवा व्हिडीओ ती शेअर करताना दिसत. आताही दीपिकानं असाच एक फोटो शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तू सर्वात बेस्ट आहेस असं म्हणत कौतुक केलं आहे. तिनं शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

दीपिका सध्या लॉकडाऊन एंजॉय करत असून पती रणवीरला नवनवे पदार्थ करुन खायला घालत आहे. ज्याचे फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असतेच पण आता तिनं कैरीचा फोटो शेअर करत, 'तू सर्वात बेस्ट आहेस. सर्वोत्कृष्ट. आतापर्यंत जे मला भेटलं आहे त्यात तू खूप बेस्ट आहेस' असं कॅप्शन दिलं आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोवरून दीपिकाकडे काही गुड न्यूज असल्याचा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे.

श्रेयस तळपदेला नक्की काय झालंय? एका डोळ्याला पट्टी पाहून चाहते चिंतेत

 

View this post on Instagram

 

You're simply the best, better than all the rest Better than anyone, anyone I ever met...

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिचा 'छपाक' हा सिनेमा जानेवारीमध्ये रिलीज झाला. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा होता. मात्र या सिनेमाला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र या सिनेमाती दीपिकाच्या अभिनयाचं मात्र सर्वांनी मनापासून कौतुक केलं होतं. हा सिनेमा दिल्लीच्या अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित होता. याशिवाय ती रणवीर सिंह सोबत '83' मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.

हृतिक रोशन कापणार होता हाताचं सहावं बोट, ऑपरेशनची तयारी सुद्धा झाली, पण...

वेब गर्ल मिथिलानं गाणं गात इरफान खानला वाहिली श्रद्धांजली, पाहा VIDEO

First published: May 3, 2020, 5:53 PM IST

ताज्या बातम्या