मस्तानी इज बॅक : जुनं सारं मागे सारुन दीपिका पादुकोणने शेअर केली ‘माय ऑडिओ डायरी’

मस्तानी इज बॅक : जुनं सारं मागे सारुन दीपिका पादुकोणने शेअर केली ‘माय ऑडिओ डायरी’

दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) सोशल मीडियावरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्यानंतर ती पुन्हा आपल्याशी संवाद साधायला सज्ज झाली आहे. 2021 वर्षातली पहिली पोस्ट तिने शेअर केली. या ऑडिओ डायरीतून (My Audio Diary) तिने चाहत्यांशी संवाद साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 01 जानेवारी: अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) सगळ्या सोशल मीडियावर अकाऊंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्यामुळे अनेक तर्कवितार्कांना उधाण आलं होतं. पण आता बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोन पुन्हा सोशल मीडियावरुन आपल्याशी संवाद साधण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपिकाने तिच्या ट्विटर (Twitter) हँडलवर आणि इन्स्टाग्रावर एका ओडिओ पोस्ट शेअर केली आहे. माय ऑडिओ डायरी (My Audio Diary) अशा नावाने तिने एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.

काय म्हणाली दीपिका?

दीपिकाने ऑडिओ पोस्टमध्ये म्हटलं आहे, ‘माझ्या ऑडिओ डायरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या ऑडिओच्या माध्यमातून मी माझे विचार मांडणार आहे. 2020 हे वर्ष जवळजवळ आपल्या सर्वांसाठीच कठीण होतं माझ्यासाठीदेखील ते कठीणच गेलं. 2021 या वर्ष तुम्हा सर्वांचा आनंदाचं जाऊदे. माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा’

2020 या वर्षात दीपिकाच्या आयुष्यात अनेक चढ - उतार आले. ड्रग केसमध्ये नाव आल्यानंतर तिला NCB चौकशीलाही सामोरं जावं लागलं होतं. दीपिका सध्या नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राजस्थानला गेली आहे. तिच्यासोबत रणवीर सिंह तिथे आहे.

पठाण सिनेमाचं शूट करत आहे. तसंच महाभारत सिनेमामध्येही ती झळकणार आहे दीपिका पहिल्यांदाच प्रभाससोबतही स्क्रीन शेअर करणार आहे. यापैकी काही चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिकाने शकुन बत्राच्या चित्रपटाचं शूटिंग संपवलं आहे. या चित्रपटामध्ये दीपिकासोबत अनन्या पांडे, सिद्धार्थ चतुर्वेदी हे कलाकारही झळकणार आहेत.

Published by: Amruta Abhyankar
First published: January 1, 2021, 3:50 PM IST

ताज्या बातम्या