मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आलिशान घरात राहते Deepika Padukone, अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला बेडरूमचा फोटो

आलिशान घरात राहते Deepika Padukone, अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला बेडरूमचा फोटो

नुकतंच दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आस्क मी एनिथिंग' सेशन घेतलं. यामध्ये अभिनेत्रीने अनेक गोष्टींची बिनधास्त उत्तरे दिली.

नुकतंच दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आस्क मी एनिथिंग' सेशन घेतलं. यामध्ये अभिनेत्रीने अनेक गोष्टींची बिनधास्त उत्तरे दिली.

नुकतंच दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आस्क मी एनिथिंग' सेशन घेतलं. यामध्ये अभिनेत्रीने अनेक गोष्टींची बिनधास्त उत्तरे दिली.

मुंबई, 7 एप्रिल-  बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री दीपिका पादुकोणने   (Deepika Padukone)  आपल्या दमदार अभिनयाने आपला खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. अलीकडेच, दुबई येथे झालेल्या एका अवॉर्ड शोमध्ये तिला सिनेमा आणि मानसिक आरोग्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल, 100 टाईम इम्पॅक्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ज्यामुळे फिटनेस कॉन्शस असलेली अभिनेत्री दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग (Ask Me Anything Session) सेशन ठेवलं होतं. यादरम्यान चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली.

नुकतंच दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आस्क मी एनिथिंग' सेशन घेतलं. यामध्ये अभिनेत्रीने अनेक गोष्टींची बिनधास्त उत्तरे दिली. दीपिका पादुकोणने तिच्या सेशनदरम्यान पहिल्यांदाच तिच्या बेडरूमची झलक शेअर केली आहे. दीपिका म्हणाली की जर ती एखाद्या ठिकाणी असती तर ती घरी असती. या उत्तरासह, अभिनेत्रीने तिच्या आलिशान बेडरूमची झलक दाखवली आहे. बेडवर बसलेल्या दीपिकाने तपकिरी रंगाचा स्वेटर घातला आहे. दीपिकाची बेडरूम अत्यंत साधी आणि उठावदार आहे. यानंतर दीपिकाने सांगितले की, जर ती कार असती तर ती टाइमलेस फियाट प्रीमियर पद्मिनी ही कार असती.

या इन्स्टाग्राम सेशनमध्ये दीपिकाने अनेक मजेशीर उत्तरे दिली आहे. तिला काही वस्तूंबद्दल विचारण्यात आलं होतं. या गोष्टींमध्ये तिला ती कोण असती असं तिला वाटतं. यावर दीपिकानेसुद्धा धम्माल उत्तरे दिली आहेत. जर ती एखादा रंग असती तर ती पांढरा रंग असती. जर ती एखादा मसाला असती तर ती निश्चितच तिखट असती. ती एखादं पेय असती तर ती हॉट चॉकलेट असती. अशी उत्तरे दीपिकाने दिली आहेत.

दीपिका पादुकोण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत चाहत्यांसोबत संवाद साधत असते. नुकतीच दीपिका पादुकोण तिच्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगनंतर स्पेनहून परतली आहे. शाहरुख खानसोबत 'ओम शांती ओम'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दीपिका 'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅपी न्यू इयर' या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत दिसणार आहे. स्पेन शूटचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Deepika padukone, Entertainment