मुंबई, 26 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगच ठप्प झालं आहे. देशभरात लॉकडाऊन केल्यानं सर्वांना घरी राहावं लागत आहे. याचा परिणाम बॉलवूडवरही झाला. अनेक कलाकारांच्या सिनेमांचं शूटिंग थांबलं असून ते सध्या काटेकोरपणे लॉकडाऊनचं पालन करत असताना दिसत आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे आणि यात बॉलिवूडच्या एका सुपरस्टार अभिनेत्री शाळेतला फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा फोटो या अभिनेत्रीच्या फॅन क्लबकडून शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सर्वांची लाडकी दीपिका पदुकोण आहे. हा फोटो दीपिकाच्या शाळेच्या दिवसांमधला आहे. या फोटोमध्ये दिपिका स्कुल युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. हा तिचा लुक पाहिल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा फोटो शाळेतल्या कोणत्यातरी इव्हेंट दरम्यान क्लिक करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिसत असलेल्या इतर व्यक्ती तिचे शिक्षक असल्याचं बोललं जात आहे.
मॉब लिंचिंगमधील मृत ड्रायव्हरच्या कुटुंबीयांसाठी रवीना टंडननं केलं मदतीचं आवाहन
दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. दीपिकाचा शाळेच्या दिवसांतला हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. याशिवाय दीपिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता.
वेब सीरिजमधील इंटिमेट सीनवर काय होती बायकोची रिअॅक्शन, मिलिंदनं केला खुलासा
सध्या दीपिका रणवीर सोबत मुंबईमध्ये असून लॉकडाऊनध्ये ती तिच्या आई-बाबांना खूप मिस करत आहे. त्यामुळे हे सर्व संपल्यावर ती सर्वात आधी आपल्या आई-वडीलांची भेट घेणार आहे. त्यानंतर ती शगुन बात्राच्या सिनेमा 'इंटर्न'च्या तयारीला सुरुवात करेल. हा 2015 मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूडच्या 'इंटर्न' सिनेमाचा हिंदी रिमेक असून यात दीपिकासोबत ऋषी कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिचा 'छपाक' हा सिनेमा जानेवारीमध्ये रिलीज झाला. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा होता. मात्र या सिनेमाला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र या सिनेमाती दीपिकाच्या अभिनयाचं मात्र सर्वांनी मनापासून कौतुक केलं होतं. हा सिनेमा दिल्लीच्या अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित होता. याशिवाय ती रणवीर सिंह सोबत '83' मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.
रात्री उशिरा बॉयफ्रेंडच्या घरातून निघत होती आलिया, बॉडीगार्ड होता नशेत आणि...