दीपिकानं सांगितलं गुपित, धोनी नाही तर ‘हा’ आहे आवडता क्रिकेटपटू!

दीपिकानं सांगितलं गुपित, धोनी नाही तर ‘हा’ आहे आवडता क्रिकेटपटू!

सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दीपिकानं तिच्या क्रिकेटप्रेमाबद्दल सांगितलं तसेच आवडत्या क्रिकेटरचं नावही सांगितलं

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिचा आगामी सिनेमा छपाकच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. छपाक व्यतिरिक्त ती रणवीर सिंह सोबत 83 सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात ती कपिल देव यांची पत्नी रोमी भाटियांची भूमिका साकरत आहे. दरम्यान 'छपाक' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दीपिकानं तिच्या क्रिकेटप्रेमाबद्दल सांगितलं. इतकंच नाही तर तिनं तिच्या क्रिकेटर क्रश बद्दलही यावेळी सांगितलं.

रणवीरसोबत क्रिकेट मॅच पाहते दीपिका

दीपिकानं सांगितलं की तिला क्रिकेट पाहायला आवडतं. ती अनेकदा रणवीरसोबत मॅच पाहते. ती म्हणाली, मी आणि रणवीर एकत्र मॅच पाहतो. सर्वांनाच माहित आहे की रणवीर फुटबॉलचा चाहता आहे पण यासोबतच त्याला क्रिकेटही आवडतं. आम्ही सर्वच मॅच पाहत नाही पण ज्या काही मोठ्या मॅच असतात त्या नक्की पाहतो. अनेकदा आम्ही मित्र आणि कुटुंबीयांसोबत बसून सामान्य लोकांप्रमाणेच मॅच पाहतो.

दीपिकाला तिच्या आवडत्या क्रिकेटर विषयी विचारण्यात आलं. यावर तिनं राहुल द्रविड तिचा आवडता क्रिकेटर असल्याचं सांगितलं तसेच राहुल द्रविडवर तिचा सिक्रेट क्रश असल्याचंही ती म्हणाली. तसेच यामागचं कारणही तिनं सांगितलं. ती म्हणाली, राहुल द्रविड मला आवडतो. मी अनेक लोकांना त्यांच्या कामासाठी पसंत करते. त्यानं खूप चांगल्याप्रकारे स्वतःला जगासमोर सादर केलं आहे आणि तो बंगळूरुचाच राहणारा आहे.

यावेळी दीपिकानं मानसिक स्वास्थ्यावरही बातचीत केली. ती म्हणाली आपल्यासाठी शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य सुद्धा गरजेच आहे. काही वेळा तुमचा मेंदू तुमच्या शरीराची साथ देत नाही. मला वाटतं आपल्याला मनाच्या शांततेची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे युवा खेळाडूंनी त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घ्यायला हवी.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांचा देशाच्या दिग्गज बॅडमिंटन खेळाडूंमध्ये समावेश होतो. 1980 मध्ये ते जगातले नंबर वन खेळाडू होते. याच वर्षी त्यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप सुद्धा जिंकणारे पहिले खेळाडू ठरले होते. तसेच अभिनय क्षेत्रात येण्याआधी दीपिका सुद्धा बॅडमिंटन खेळत असे. पण अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिनं बॅडमिंटन खेळणं सोडलं.

Published by: Megha Jethe
First published: December 13, 2019, 8:16 AM IST

ताज्या बातम्या