भिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ओटीटीवरचा (OTT) पहिला वहिला चित्रपट गेहराईयाँचा ट्रेलर (Gehraiyaan movie trailer) प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्यातील इंटिमेट बोल्ड सिन्सची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
नवी दिल्ली, 28 जानेवारी: अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ओटीटीवरचा (OTT) पहिला वहिला चित्रपट गेहराईयाँचा ट्रेलर (Gehraiyaan movie trailer) प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्यातील इंटिमेट बोल्ड सिन्सची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान, अभिनेत्रीने या सीन्सवर स्वतः खुलासा केला आहे.
गहराईयाँचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चार प्रमुख व्यक्तिरेखा दिसल्या आहेत. या व्यक्तिरेखांचे आयुष्य एकमेकांत गुंतलेले आहे. चित्रपटाचा ट्रेलर दमदार आहे. यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यातील अनेक रोमँटिक सीन देखील दाखवण्यात आले आहेत.
दरम्यान, एक मुलाखतीत दीपिकाने इंटिमेट बोल्ड सिन्सवर भाष्य केले आहे. ती म्हणाली, या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले नसते तर कदाचित मी या चित्रपटची ऑफर स्विकारली नसती. या चित्रपटात आम्ही बऱ्याच नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे.
हे सर्व करताना आम्ही कम्फर्टेबल होतो आणि शकुन बत्रा यांनी हे सर्व आमच्याकडून करुन घेतलं कारण त्यांना आमच्यावर विश्वास होता. जर या चित्रपटात काही इंटीमेट सीन आहेत तर ते प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी नाही तर ती त्या कथेची गरज होती म्हणून आहेत. जर शकुन बत्राच्या जागी इतर कोणी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असतं तर मी यात काम केलंच नसते. ते नसते तर मी काही दृष्यांपासून लांबच राहणे पसंत केले असते.
आपण याआधी भारतीय चित्रपटसृष्टीत जे पाहिलं नाही ते या चित्रपटातील दृश्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. माझी भूमिका ही ‘बोल्ड’ नाही तर ‘रिअल’ आहे. मी यापूर्वी कधीही अशा पद्धतीची भूमिका केली नव्हती. असेही तिने यावेळी सांगतले.
या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले आहे. हा चित्रपट सध्याच्या नातेसंबधांवर भाष्य करणारा आहे. एका इंग्रजी माध्यमास मुलाखत देताना दीपिका या चित्रपटातील आपल्या भूमिके विषयी म्हणाली, मी याला वयाशी अथवा लिंगाशी जोडत नाही. यामध्ये जे काही घडत आहे, ते अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिकपणे घडत आहे. त्यामुळे ती गोष्ट बरोबर आहे.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.