मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया-भट्ट-रणबीर कपूर आज सुरू करणार नवा अध्याय, दीपिका पादुकोणने दिली प्रतिक्रिया?

आलिया-भट्ट-रणबीर कपूर आज सुरू करणार नवा अध्याय, दीपिका पादुकोणने दिली प्रतिक्रिया?

 सध्या बॉलिवुड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. बॉलिवुडमधील हे लव्ह बर्ड्स आज (14 एप्रिल 2022) लग्न बंधनात (Ranbir Kapoor and Alia Bhatt’s wedding) अडकणार असल्याचं वृत्त आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 14 एप्रिल-   सध्या बॉलिवुड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. बॉलिवुडमधील हे लव्ह बर्ड्स आज (14 एप्रिल 2022) लग्न बंधनात (Ranbir Kapoor and Alia Bhatt’s wedding) अडकणार असल्याचं वृत्त आहे. चाहत्यांप्रमाणेच त्यांच्या को-स्टार्सच्या मनातही या लग्नाबाबत उत्सुकता आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या बातमीवर दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone) प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या दीपिकानं डिरेक्टर अयान मुखर्जीची (Ayan Mukerji) एक पोस्ट लाईक केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अयाननं 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'केसरिया' गाण्याचा टीझर लाँच करत आलिया-रणबीरच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दीपिकानं अयानची तीच पोस्ट लाईक करून या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीर आणि आलिया आज (गुरुवार, 14 एप्रिल 22) रोजी लग्न करणार आहेत. रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

13 एप्रिल रोजी आलिया-रणबीरच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याच्या दिवशी दिग्दर्शक अयान मुखर्जीनं 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील 'केसरिया तेरा इश्क' (Kesariya Tera Ishq) गाण्याचा टीझर रिलीज करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. हा व्हिडिओ म्हणजे रणबीर-आलियाच्या लग्नाची घोषणाच असल्याचं म्हटलं जात आहे. टीझरच्या माध्यमातून अयाननं दोघांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. व्हिडिओमध्ये आलिया आणि रणबीर वाराणसीतील रस्त्यांवर केसरिया गाण्यावर रोमान्स करताना दिसत आहेत. अयानच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड स्टार्सनी कमेंट केल्या आहेत.

अयान मुखर्जीच्या पोस्टवर दीपिकानं दिली रिअ‍ॅक्शन

'केसरिया तेरा इश्क'चा टीझर असलेली अयान मुखर्जीची पोस्ट लाईक करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही नाव आहे. रणबीर-आलियाचा रोमँटिक टीझर दीपिकालाही आवडला आहे. दीपिकानं अद्याप दोघांच्या लग्नाबद्दल उघडपणे काहीही कमेंट केलेली नसली तरी, तिच्या रिअ‍ॅक्शनवरून तिला आलिया-रणबीरची जोडी आवडल्याचं दिसत आहे. दीपिका व्यतिरिक्त अनुष्का शर्मा, अभिषेक बच्चन, मलायका अरोरा, सुहाना खान, काजोल आणि अनन्या पांडे यांनीही अयानची पोस्ट लाईक केली आहे आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

'या' चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत रणबीर-दीपिका

काही वर्षांपूर्वी दीपिका आणि रणबीर एकमेकांना डेट करत होते. त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि लवकरच दोघांचं ब्रेकअप (Breakup) झालं. दोघांनी 'ये जवानी है दीवानी' आणि 'तमाशा' या चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलेलं आहे. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकानं अभिनेता रणवीर सिंगशी लग्न केलं. सध्या ती आपली मॅरिटल लाईफ एन्जॉय करत आहे. तर, आता रणबीर कपूरही अभिनेत्री आलियासोबत त्याच्या लव्ह लाईफची सुरुवात करणार आहे. आज रणबीर आलियासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Deepika padukone, Entertainment, Ranbir kapoor, Wedding