मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Deepveer : लग्नाच्या 4 वर्षांनंतर दीपिका रणवीरच्या नात्यात उडाले खटके? व्हायरल ट्विटमुळे चाहते हैराण

Deepveer : लग्नाच्या 4 वर्षांनंतर दीपिका रणवीरच्या नात्यात उडाले खटके? व्हायरल ट्विटमुळे चाहते हैराण

दीपिका रणवीर

दीपिका रणवीर

अभिनेत्री दीपिका पागुकोण आणि रणवीर सिंह यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 29 सप्टेंबर : बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. दोघांनी 2018मध्ये इटलीमध्ये लग्न केलं. 6 वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  दोघांच्या लग्नाची सर्वत्र प्रचंड चर्चा झाली होती. इतकंच काय तर लग्न झाल्यापासून दीपिका आणि रणवीर सातत्यानं सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असतात. दोघांच्या नात्याच्या सतत चर्चा सुरू असतात. दोघांचं फोटोशूट असो किंवा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणं असो. दरम्यान दोघांच्या नात्यात खटके उडल्याची माहिती समोर आली आहे. रणवीर आणि दीपिका यांच्यात नात्यात काही तरी प्रोब्लेम आहे असं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग! #deepikapadukone आणि #ranveersingh यांच्यात सगळं काही ठिक नाही असं लिहिलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  त्याचप्रमाणे त्याचबरोबर एक व्हिडीओ देखील जोडण्यात आला आहे. रणवीर नुकताच एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. ज्यात त्याला त्याच्या आणि दीपिकाच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले गेले.  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये रणवीर म्हणतोय, टचवुड, 2012पासून आम्ही एकमेकांबरोबर डेटिंग सुरू केली.  या वर्षी 2022मध्ये मला आणि दीपिकाला एकत्र येऊन 10 वर्ष झाली आहेत.

हेही वाचा - Filmfire मिळताच रणवीर झाला रोमँटिक; बायकोला सगळ्यांसमोर केलं किस, Video व्हायरल

रणवीरचा हा व्हिडीओ काही दिवसांआधीचाच आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली क्लिप अर्धवट असून त्याच्या कॅप्शनमधून रणवीर आणि दीपिकाच्या नात्याविषयी चुकीची माहिती दिली जात आहे. दरम्यान त्या कार्यक्रमावेळी रणवीरनं सांगितलं होतं की दीपिका आणि तो एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्याच्यात  सगळं काही ठीक सुरू आहे.

त्याचप्रमाणे दोघांना पुन्हा एकत्र सिनेमा कधी पाहायला मिळणार असा प्रश्न विचारला असता रणवीरनं, तुमच्यासाठी सप्राइज आहे. लवकरच आम्ही पुन्हा एकत्र दिसणार आहोत. दीपिका माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद आहे. तिचे मी नेहमीच आभार मानतो.

सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोणला अस्वस्थेतेमुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  12 तास ती रुग्णालयात होती. तिथे तिच्या अनेक टेस्ट करण्यात आल्या. तर दुसरीकडे काही दिवसांआधी अभिनेता रणवीर सिंहला न्यूड फोटोशूट प्रकरणी प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मुंबईत अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान या सगळ्यात रणवीर आणि दीपिका एकमेकांची साथ देत आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News