Video : दीपिकाचा हा रिसेप्शन ड्रेस बनवण्यासाठी लागले 16 हजार तास

Video : दीपिकाचा हा रिसेप्शन ड्रेस बनवण्यासाठी लागले 16 हजार तास

दीपिका पदुकोणच्या लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत लुकची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळाली. दीपिकाच्या रिसेप्शनसाठी असलेला हा ड्रेस कसा तयार झाला ते पाहा

  • Share this:

मुंबई, 30 नोव्हेंबर : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या जेवणापासून ते सजावटीपर्यंत चर्चा झाल्या होत्या. त्यांचे लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले.

दीपिका-रणवीरनं लग्नानंतर एकूण 3 रिसेप्शन पार्टी दिल्या आहेत ज्यातील दोन झाल्या असून 1 डिसेंबरला होणार आहे. 28 नोव्हेंबरला झालेल्या मुंबईतील रिसेप्शनमध्ये दीपिका आणि रणवीर सुंदर दिसत होते. रिसेप्शनसाठी दीपिकाचा एखाद्या महाराणीसारखा लुक होता.

मुंबईतल्या रिसेप्शनसाठी दीपिकाचा ड्रेस अबु जानी आणि संदीप खोसलाने डिझाइन केला होता. सफेद रंगाच्या ड्रेसवर सोनेरी रंगाचं नक्षीकाम करण्यात आलं होतं.

ड्रेस बनवण्यासाठी एकूण 16000 तास लागले असल्याचं ड्रेस डिझायनरने सांगितलं आहे. डिजाइनर अबु जानी आणि संदीप खोसलाने हा दीपिकाचा ड्रेस तयार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

1 डिसेंबरला दीपिका आणि रणवीरच्या तिसरं रिसेप्शन असणार आहे. लग्नानंतर हे शेवटचं रिसेप्शन असेल. या रिसेप्शन पार्टीला खास बॉलिवूडचे सर्व कलाकार उपस्थित असणार आहेत. यानंतर दोघेही त्यांच्या संसारात मग्न होतील. लग्नाच्या मोठ्या सुट्टीनंतर रणवीर सिंबा चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यग्र होईल.

करण जोहर निर्मित सिंबा चित्रपटात रणवीर सिंगसोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत असेल. येत्या 28 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून 3 डिसेंबरला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

First published: November 30, 2018, 7:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading