JNU वाद : ...दीपिकाला राहुल गांधी पंतप्रधान झालेले पाहायचं होतं, जुना Video Viral

JNU वाद : ...दीपिकाला राहुल गांधी पंतप्रधान झालेले पाहायचं होतं, जुना Video Viral

दीपिकाने साबरमती हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली त्यानंतर तिचा काही वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी : जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. या हिंसाचाराविरोधात आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले असून स्टार अभिनेत्री दीपिका पदूकोणही जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीला दाखल झाली आहे. दीपिकाने साबरमती हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराविरोधात निषेध वर्तवला आहे. यावेळी दीपिकाच्याबरोबर कन्हैया कुमारही उपस्थित होता.

दरम्यान तिचा काही वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. राजकारणापासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या दीपिकानं काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सांगितलं होतं, मला राजकारणाबद्दल फार काही माहित नाही. पण जे काही मी टीव्हीवर पाहते त्यावरुन मला वाटतं राहुल गांधी आपल्या देशासाठी जे काही करत आहेत ते आपल्या देशासाठी एक चांगलं उदाहरण आहे. ते आपल्या देशासाठी खूप काही करत आहेत. मला वाटतं ते एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील.

दीपिका पुढे म्हणाली, मला वाटतं की राहुल गांधी पंतप्रधान व्हावे. कारण त्यांच्यातली खास गोष्ट अशी आहे की ते तरुणाईसोबत चांगल्या प्रकारे जोडले जातात. त्यांचे विचार पारंपरिक तर आहेतच पण त्यासोबतच भविष्याच्या दृष्टीकोणातूनही महत्त्वपूर्ण आहे. जे आपल्या देशासाठी महत्त्वाचे आहेत.

दरम्यान, दीपिका जेएनयूमध्ये गेल्याच्या बातम्या माध्यमांवर पसरल्यानंतर नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. छपाक सिनेमावर बंदी आणावी यासाठी सोशल मीडियावर दीपिका विरोधात ट्रोलिंग सुरू झालं आहे.

काही नेटकरी दीपिकाच्या विरोधात बोलत आहेत तर काही नेटकऱ्यांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ट्वीटरवर #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. छपाक सारखा सिनेमा करणारी दीपिका तुकडे-तुकडे गँगला भेटण्यासाठी गेली अशा टीका करत नेटकऱ्यांनी दीपिकाचा छपाक सिनेमा पाहू नका असा ट्रेंड सुरू केला आहे.

JNU मध्ये झालेल्या हल्ल्याचा याआधीही अनिल कपूर, आलिया भट, राजकुमार राव, ट्विंकल खन्ना, अनुराग कश्यप आणि सोनम कपूर यांनी निषेध केला होता. या हल्ल्याला सर्वांनीच भ्याड, भीतीदायक आणि निर्दयी म्हटलं आहे. असा भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Published by: Megha Jethe
First published: January 8, 2020, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading