दीपिका पदुकोण देणार गुड न्यूज! या VIRAL VIDEO मुळे रंगतेय लागली चर्चा

दीपिका पदुकोण देणार गुड न्यूज! या VIRAL VIDEO मुळे रंगतेय लागली चर्चा

काही दिवसांपासून दीपिका पदुकोण प्रेग्नन्ट असल्याचं बोललं जात आहे. नुकतंच हे क्यूट कपल लंडनमध्ये स्पॉट झाले आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : बॉलिवूडचं हॉट कपल दीपवीर सध्या खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपासून दीपिका पदुकोण प्रेग्नन्ट असल्याचं बोललं जात आहे. नुकतंच हे क्यूट कपल लंडनमध्ये स्पॉट झाले आहे. त्यावेळचे काही त्यांचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आल्यानंतर दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना जोर चढला आहे. यावेळी दीपिकानं जे कपडे घातले आहेत ते पाहून हा अंदाज लावला जात आहे.

दीपिकानं यावेळी सैल कपडे घातले होते. त्यामुळे बेबी बंप लपवण्यासाठी दीपिका अशा प्रकारचे कपडे घालत असल्याचं बोललं जात आहे. मात्र सर्व चर्चा खऱ्या आहेत की अफवा याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. प्रेग्नन्सी बाबत दीपिका किंवा रणवीरनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Google Doodle : 100 व्या जयंती निमित्त कवयित्री अमृता प्रीतम यांना आदरांजली!

 

View this post on Instagram

 

#deepikapadukone and #ranveersingh in London hand in hand ❤

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मागच्या काही दिवसांपासून दीपिका पदुकोण अतरंगी आणि ढगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. त्यामुळे तिला ट्रोलही केलं गेलं आहे. नेहमीच स्टायलिश आणि फिगर डिफायनिंग कपडे घालणारी दीपिका मागच्या काही दिवसांपासून सैल कपडे का घालत आहे यावर सगळीकडेच चर्चा होती. नुकतेच हे दोघंही लंडनमध्ये एकमेकांच्या हातात हात घालून दिसले. यावेळी दीपिकानं नियॉन ग्रीन कलरचा सैल ड्रेस घातला होता.

अभिनेत्री कृति सेनन होणार सरोगसी मदर, ‘मिमी’चा फर्स्ट लुक रिलीज

 

View this post on Instagram

 

#deepikapadukone off to London #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दीपिका आणि रणवीरच्या या फोटोंवरून हे दीपिका प्रेग्नन्ट असल्याचा अंदाज लावला जात आहे. एका युजरनं लिहिलं, दीपिका स्वतःला अशा कपड्यांमध्ये झाकून घेत बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आणखी एका युजरनं लिहिलं, दीपिका मीडियापासून प्रेग्नन्सी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. अशाचप्रकारच्या अनेक कमेंट सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.

एकेकाळी 'हँडसम बॉय' असलेला अक्षय खन्ना आता दिसतो असा, PHOTO VIRAL

काही दिवसांपूर्वी दीपिकानं रणवीर सिंहच्या लाइव्ह व्हिडीओवर कमेंट करताना त्याला हॅलो डॅडी म्हटलं होतं तेव्हापासून तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या कमेंटमध्ये तिनं लहान बाळाचा इमोजी सुद्धा वापरला होता. याशिवाय यावर अभिनेता अर्जुन कपूरनं सुद्धा कमेंट केली होती. त्यावरुनच दीपिका प्रेग्नन्सीच्या चर्चा सुरू झाल्या मात्र यावर दीपिकानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हार्दिक पांड्याची विकेट घेणारी नताशा आहे तरी कोण ?

========================================================================

VIDEO: गणेशोत्सवाच्या 'या' दिवसांत रात्री 12 पर्यंत स्पीकर्सना परवानगी इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 01:05 PM IST

ताज्या बातम्या