मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ऊँचे लोग ऊँची पसंद; दीपिकाच्या ‘या’ काळ्या मास्कची किंमत वाचून येईल चक्कर

ऊँचे लोग ऊँची पसंद; दीपिकाच्या ‘या’ काळ्या मास्कची किंमत वाचून येईल चक्कर

फक्त 14% लोकच नाक, तोंड आणि हनुवटी झाकली जाईल अशा योग्यप्रकारे मास्क लावतात.

फक्त 14% लोकच नाक, तोंड आणि हनुवटी झाकली जाईल अशा योग्यप्रकारे मास्क लावतात.

या मास्कची किंमती जास्तीत जास्त किती असेल? असं तुम्हाला वाटतं? 10 रुपये? 50 रुपये? 200 रुपये? की 500. अहो बॉलिवूड सेलिब्रिटी वापरत असलेल्या एका मास्कची किंमत पाहून तुम्हाला देखील चक्कर येईल.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई, 12 फेब्रुवारी: करोना विषाणूचं वाढतं संक्रमण अद्याप पूर्णपणे थांबलेलं नाही. परिणामी या करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी वैद्यकिय तज्ज्ञ आणि डॉक्टर्स तोंडावर मास्क लावण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे आपण सर्वच जण घराबाहेर पडताना मास्कचा वापर करत आहोत. पण बाजारात उपलब्ध असलेल्या या मास्कची किंमत जास्तीत जास्त किती असेल? असं तुम्हाला वाटतं? 10 रुपये? 50 रुपये? 200 रुपये? की 500 रुपये. अहो बॉलिवूड सेलिब्रिटी वापरत असलेल्या एका मास्कची किंमत पाहून तुम्हाला देखील चक्कर येईल.

अलिकडेच प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) एका बॉलिवूड पार्टीत हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं संपूर्ण काळ्या रंगाचा पोषाख परिधान केला होता. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष, अहो पण सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं ते तिच्या काळ्या मास्कनं. दीपिकानं या कंपनीचा जो मास्क आपल्या तोंडावर लावला होता त्याची किंमत तब्बल 25 हजार रुपये इतकी आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार हा मास्क होता लुईस वेटॉन (Louis Vuitton mask) या कंपनीचा. ही कंपनी अत्यंत महागड्या वस्तूंसाठी ओळखली जाते. या कंपनीनं तयार केलेला या मास्कचा दिवसभर वापर केला तरी देखील कुठल्याही प्रकरचा त्रास जाणवत नाही असा या कंपनीचा दावा आहे. अर्थात या विशेष मास्कची निर्मिती केवळ उच्चभ्रू ग्राहकांसाठीच करण्यात आली आहे.

हे वाचा  - बारामतीत अवतरले BIG B; स्वागताला आल्या खुद्द मिसेस उपमुख्यमंत्री

मास्क कसा वापरावा?

मास्कमुळे तुमचं नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकली गेली पाहिजे.

मास्क चेहऱ्यावर घट्ट बसले पाहिजे.

मास्क घालताना किंवा काढताना पृष्ठभागाला हात लावू नका. त्यापूर्वी आणि नंतरही हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत

मास्क घातल्यानंतर खोकताना किंवा बोलताना मास्क खाली करू नये. यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असते

एकदाच वापरायचे (युज अ‍ॅण्ड थ्रो) मास्क एकदाच वापरून पुन्हा वापरू नयेत.

साधे कापडी मास्क स्वच्छ धुतल्याशिवाय वापरू नयेत. हे मास्क वापरल्यानंतर गरम पाण्यात धुऊन पुन्हा वापरले तरी चालेल.

First published:

Tags: Coronavirus, Deepika padukone, Mask