नव्या वर्षी दीपिका घेणार 'या' तीन गोष्टींचा शोध

नव्या वर्षी दीपिका घेणार 'या' तीन गोष्टींचा शोध

दीपिका आणि रणवीर सध्या हनिमूनला गेलेत. तिथून तिनं इन्स्टाग्रामवर पहिल्यांदा पोस्ट केलंय. त्यात तिचा नव्या वर्षाचा संकल्पच दिसून येतोय.

  • Share this:

मुंबई, 03 जानेवारी : दीपिका आणि रणवीर सध्या हनिमूनला गेलेत. तिथून तिनं इन्स्टाग्रामवर पहिल्यांदा पोस्ट केलंय. त्यात तिचा नव्या वर्षाचा संकल्पच दिसून येतोय.

दीपिकानं तीन उशांचे फोटोज पोस्ट केलेत. या पांढऱ्या उशांवर 'वेल बिंग', 'हार्मनी' आणि 'युनिक' असं लिहिलंय. याचा अर्थ कल्याण, सद्भभाव आणि अद्वितीय असा आहे. याचा अर्थ दीपिकाला नव्या वर्षी या तीन गोष्टी हव्यात.

View this post on Instagram

#2019

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

सगळीकडे सगळं चांगलं, आनंदाचं वातावरण असावं. शिवाय काही तरी युनिक मिळावं या तिच्या नव्या वर्षाकडून अपेक्षा आहेत.

हनिमूनहून परतल्यावर दीपिका मेघना गुलजारच्या छप्पाक सिनेमाचं शूटिंग करणार आहे. अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवालवर हा सिनेमा आहे.दीपिका लक्ष्मीचीच भूमिका करतेय.

फोर्ब्स मासिकानं नुकतीच श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. त्यात बाॅलिवूडच्या अभिनेत्रींनी मोठं यश मिळवलंय.

या सगळ्या यादीत अग्रक्रमावर आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण. फोर्ब्स मासिकाच्या पाच श्रीमंतांच्या यादीत स्त्रियांमध्ये दीपिकाचा नंबर वन आहे. दीपिकाची 2018मधली कमाई 112.80 कोटी आहे.

11 वर्षांपूर्वी दीपिकानं ओम शांती ओम सिनेमातून सुरुवात केली. पद्मावत, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर, बाजीराव मस्तानी, रामलीला, ये जवानी है दिवानी हे सहा सिनेमे 100 कोटींच्या घरात गेले. आज दीपिका एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये घेते.

दीपिका पदुकोण लग्नानंतरही फिटनेसबाबत शिस्तबद्ध आहे. हेल्थविषयी दीपिका आजही तितकीच काळजी घेताना दिसते. लग्नानंतरही बॉलिवूडमध्ये दीपिकाला आपली छबी कायम ठेवायची असेल तर तिला फिट राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे दीपिकाला आपल्या डाएटसोबतच वर्कआऊटवर पण जास्त लक्ष देते.

जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार, आकडा ऐकून बसेल धक्का

First published: January 3, 2019, 3:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading