न्यूयॉर्कला जाऊन ऋषी कपूरना भेटली रणबीरची 'ही' एक्स गर्लफ्रेंड

रणबीरची आई नीतू कपूर यांनी त्यांच्या या भेटीचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

News18 Lokmat | Updated On: May 12, 2019 03:31 PM IST

न्यूयॉर्कला जाऊन ऋषी कपूरना भेटली रणबीरची 'ही' एक्स गर्लफ्रेंड

मुंबई, 12 मे : अभिनेता ऋषी कपूर मागच्या एक वर्षापासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहेत. सध्या ते कॅन्सरमुक्त झाले असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्याला कॅन्सर झाला होता याची कबूली दिली होती. मागच्या वर्षभरात अनेक बॉलिवूड कलाकारांनी न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. बॉलिवूडच्या इतर कलाकारांप्रमाणे मेट गाला इव्हेंटसाठी न्यूयॉर्कला गेलेली दीपिकाही नुकतीच ऋषी कपूर यांना भेटायला पोहोचली. रणबीर कपूर सोबत ब्रेकअप झाल्यानंतरही त्यांच्यात आता चांगली मैत्री आहे. म्हणूनच मागचं सर्व विसरून दीपिकानंही ऋषी कपूरना भेटून त्यांच्या सोबत काही वेळ घालवला. दीपिकाच्या या खास भेटीच काही फोटो नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.

ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दीपिका ऋषी आणि नीतू कपूर यांच्यासोबत हसताना दिसत आहे. या फोटोंना नीतू यांनी, 'एक सुंदर संध्याकाळ दीपिका सोबत' असं कॅप्शन दिलं. अभिनेता ऋषी कपूर सप्टेंबर 2018 पासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहेत. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी कोणता आजार झाला आहे हे जाहीररित्या बोलणं नेहमीच टाळलं. काही दिवासांपूर्वीच निर्माता राहुल रवैल यांनी ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता याचा खुलासा त्यांच्या फेसबुक पोस्टमधून केला होता.
Loading...

 

View this post on Instagram
 

Such a fun evening with adorable @deepikapadukone .. gave lot of love n warmth


A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

ऋषी कपूर यांनी कॅन्सरमधून पूर्णपणे बरे झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत कॅन्सरच्या उपचारांचा अनुभव काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. ते म्हणाले, 'यूएसमध्ये 8 महीन्यांची माझी ट्रीटमेंट 1 मे ला सुरू झाली होती. मात्र देवाची माझ्यावर कृपा होती. आता मी कॅन्सर फ्री आहे. या सर्व कठीण काळात माझ्या पत्नीनं मला खंबीरपणे साथ दिली. खरंतर माझ्यासारख्या हट्टी माणसाला सांभाळणं खूप काठीण आहे मात्र नीतूनं कधीच काही तक्रार केली नाही.' ऋषी कपूर कॅन्सर फ्री झाले असले तरीही त्यांची ट्रीटमेंट अद्याप सुरू असून त्यांना रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागणार असल्याचं डॉक्टर्सनी सांगितलं आहे.


VIDEO : गणेश गायतोंडेपेक्षा कमी नव्हता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या खऱ्या आयुष्यातील संघर्ष
 

View this post on Instagram
 

That amazing feeling in your lows when there is Positivity Happiness Love and that Wink !!!!


A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

दीपिकाच्या काही दिवस अगोदरच रणबीर कपूर आपल्या वडीलांना भेटायला न्यूयॉर्कला गेला होता. रणबीर आणि दीपिका 2008 ते 2014 या काळात रिलेशिपमध्ये होते. पण नंतर ते वेगळे झाले आणि मागील वर्षी म्हणजे नोव्हेंबर 2018मध्ये दीपिकानं रणवीर सिंहसोबत लगीन गाठ बांधली. मात्र दीपिका आणि रणबीरची मैत्री मात्र आजही कायम आहे. दीपिकाच्या आधी आलिया भट, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर यांनीही ऋषी कपूर यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली होती.


'SOTY 2'वरून कंगनाची बहीण रंगोलीनं करण जोहरवर साधला निशाणा


Sacred Games 2चं नवं पोस्टर काय सांगतं , गणेश गायतोंडेची पुन्हा दहशत ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 03:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...