मुंबई, 03 जानेवारी : धूम चित्रपटांची मालिका भारतामध्ये सुपरहिट ठरली आहे. जॉन अब्राहम (John Abraham), हृतिक रोषन (Hrithik Roshan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांनी साकारलेल्या खलनायकांच्या भूमिका हिरोपेक्षा जास्त भाव खाऊन गेल्या होत्या. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे धूमच्या चौथ्या (Dhoom 4) भागाची.
धूम 4 चित्रपटात आणखी एक ट्वीट आहे. तो ट्विस्ट म्हणजे, धूम 4 चित्रपटात एक अभिनेत्री मुख्य खलनायिका साकारणार आहे. दीपिका पादुकोणचं (Deepika Padukone) नाव या रोलसाठी जवळजवळ निश्चित झालं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिकादेखील पहिल्यांदाच ग्रे शेडची भूमिका साकारणार आहे. धूम 4 मध्ये अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राच्या भूमिकाही निश्चित मानल्या जात आहेत.
धूम 4 मध्ये रणवीर सिंह आणि शाहरुखला मागे टाकत दीपिकाने बाजी मारली आहे. म्हणजे दीपिका लवकरच आपल्याला स्टायलिश चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिकासाठी हा रोल करिअरमधील गेंम चेंजर ठरेल अशी शक्यता निर्माते व्यक्त करत आहेत. याआधी ऐश्वर्या राय बच्चननेही धूम चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली होती. धूमचे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरले होते आता धूम 4 ची जादू कितपत चालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
View this post on Instagram
दरम्यान, 1 जानेवारी 2021 रोजी दीपिकाने सोशल मीडियावर अकाऊंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्यामुळे अनेक तर्कवितार्कांना उधाण आलं होतं. पण त्याच दिवशी दीपिकाने तिच्या ट्विटर (Twitter) हँडलवर आणि इन्स्टाग्रावर एका ओडिओ पोस्ट शेअर केली होती.