…म्हणून सगळ्यांसमोर दीपिकाने रणवीरला केलं किस

…म्हणून सगळ्यांसमोर दीपिकाने रणवीरला केलं किस

यावेळी रणवीरला सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार दीपिकाने त्याला दिला.

  • Share this:

मुंबई, २५ मार्च- रणवीर सिंगसाठी २०१८ हे वर्ष फार चांगलं होतं. गेल्यावर्षी रणवीरचे पद्मावत आणि सिंबा हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. विशेष म्हणजे हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर होते. याशिवाय याच वर्षी त्याने गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणशी लग्न केलं. दोघांनी इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. दोघं अनेकदा सोशल मीडियावर तसेच अनेक कार्यक्रमात एकमेकांसाठीचं प्रेम व्यक्त करत असतात.

६४ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही असंच काही पाहायला मिळालं. यावेळी रणवीरला सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार दीपिकाने त्याला दिला. यावेळी रणवीरने गुडघ्यांवर बसून दीपिकाला विचारलं की, ‘तुला माझा अभिमान वाटतो का?’ या प्रश्नाचं उत्तर दीपिकाने त्याला किस देत दिलं. सध्या सोशल मीडियावर हाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात रणवीर गुडघ्यावर बसलेला आणि दीपिका त्याला किस करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

It’s been a good season!🌟🙏🏽 Best Actor in a Leading Role (Critics) #filmfareawards #abundance #countingmyblessings

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीरला हा पुरस्कार पद्मावत सिनेमासाठी मिळाला. या सिनेमात त्याने दीपिकासोबत काम केलं होतं. सुलतान अलाउद्दीन खिल्जीची व्यक्तिरेखा त्याने यात साकारली होती. तर दीपिकाने पद्मावती आणि शाहिद कपूरने महारावल रतनसिंहची भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

🙏🏽Thank you @radiomirchi for honouring my journey as an artist! 🏆🌟

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. यांच्याशिवाय या सिनेमात रजा मुराद, जिम सर्भ, अदिती राव हैदरी यांच्याही मुख्य भूमिका होत्या.

VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका

First published: March 25, 2019, 6:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading