#BoycottChhapaak नंतर आता #TanhajiChallenge; दीपिकाविरोधात सोशल मीडियात नवा ट्रेंड

#BoycottChhapaak नंतर आता #TanhajiChallenge; दीपिकाविरोधात सोशल मीडियात नवा ट्रेंड

दीपिका पदुकोणने JNU ला भेट दिल्यापासून छपाक (Chhappak) च्या अडचणीत वाढ झाली आहे. अनेकांनी सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग रद्द केलं आहे. त्याच दिवशी रीलिज होणाऱ्या Tanhaji सिनेमाची तिकिटं घेऊन लोक आता वेगळा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 8 जानेवारी : अभिनेत्री दीपिका पदुकोण चा 'छपाक' सिनेमा  10 जानेवारीला रिलीज होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. मात्र आता हा चित्रपट वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. मंगळवारी दीपिकाने  जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (JNU) हजेरी लावली. कन्हैय्या कुमारसारख्या आंदोलकांबरोबर JNU मध्ये दाखल झाल्याने अनेकांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली. सोशल मिडियावर #BoycottChhapaak चा ट्रेंड सुरू झाला. आता त्याच्या पुढे #TanhajiChallenge नावाचा नवा हॅशटॅग ट्रेंड होतोय. दीपिकाच्या छपाकचा निषेध म्हणून अनेक जण अॅडव्हान्स बुकिंग केलेली तिकिटं परत करत आहेत.

दीपिकाच्या JNU मधल्या उपस्थितीबाबत सोशल मीडियात दोन मतप्रवाह आहेत. काहींनी दीपिकाच्या 'JNU' मध्ये जाण्याला समर्थन दिलं आहे, तर तिथेच काहींना तिचं 'JNU' मध्ये जाणं पटलेलं नाही. ज्यांना दीपिकानं JNU ला  नाही त्यांनी तिच्या या कृतीला विरोध दर्शवण्यासाठी सोशल मिडियावर तिला ट्रोल केलं आहे. छपाक चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग रद्द केलं आहे. तिकीट कॅन्सल करून अनेकांनी त्याचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

मंगळवारी रात्री पासूनच लोकांनी दीपिकाच्या 'छपाक' ला विरोध करण्यास सुरुवात केली.

'छपाक' ला विरोध करणाऱ्या लोकांनी 'छपाक' ची बुक केलेली तिकीटं जी त्यांनी कॅन्सल केली त्याचे स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत.

काहींनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत तर काहींनी आपल्या मित्रपरिवारासोबत 'छपाक' चं तिकिट बुक केलं होतं. मात्र आता अनेकांनी दीपिकाचा 'छपाक' न पाहण्याचा निर्णय घेतला आहे आणि सोबतच इतरांनाही 'छपाक' च्या ऐवजी 'तान्हाजी' बघण्याचं आवाहन केल आहे. आता या सगळ्याचा बॉक्स ऑफिवर याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अन्य बातम्या

एकाही 'हीरो'नं नाही तर, 'या' अभिनेत्रींनी दीपिकाला दिला पाठिंबा

लग्नानंतर नेहा पेंडसेचा गौप्यस्फोट, नवऱ्याचं तिसरं लग्न आणि दोन मुलांचा बाप

JNU वाद : दीपिकाला राहुल गांधी पंतप्रधान झालेले पाहायचं होतं, जुना Video Viral

Published by: Manoj Khandekar
First published: January 8, 2020, 5:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading