मुंबई, ०६ मार्च २०१९- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्यावर्षी लग्न केलं. बॉलिवूडचं हे हॉट कपल ऑफ स्क्रिन अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. पण ऑन स्क्रिन दीपिकाला नवऱ्यापेक्षा एक्स- बॉयफ्रेंडसोबतच अधिक पसंत केलं जातं. म्हणूनच की काय दीपिका आणि रणबीरच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे.
दीपिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती डेस्कवर काही पुस्तकांसोबत दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये दीपिकाने शूटिंग क्लॅपच्या इमोजीचा वापर केला आहे. या फोटोवर रणवीर सिंगने कमेंटही केली आहे.
कमेंटमध्ये रणवीरने लिहिले की, ‘Hello Dimple. We meet again…’ रणवीरने आपल्या कमेंटच्या पुढे किसची इमोजीही वापरली. लवकरच रणबीर आणि दीपिका एकत्र काम करताना दिसणार आहेत. ब्रेकअपनंतर रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणने ये जवानी है दिवानी सिनेमात एकत्र काम केलं होतं. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.
‘इंडिया टुडे कॉनक्लेव’मध्ये रणवीर सिंग म्हणाला होता की, रणबीर आणि दीपिकाने एकत्र काम केल्यावर त्याला कधीच असुरक्षित वाटत नाही. याउलट प्रश्न विचारता रणवीर म्हणाला की, ‘मी तुम्हाला असुरक्षित माणूस वाटतो का? मला हे पूर्ण माहीत आहे की मी कोण आहे आणि काय आहे. मला हे पूर्णपणे माहीत आहे की दीपिकाला कोणच एवढं प्रेम करू शकत नाहीत जेवढं मी करतो.’