पुण्यात मिळते दीपिका पदुकोणच्या नावाची पराठा थाळी, अभिनेत्रीनं दिली 'अशी' प्रतिक्रिया

पुण्यात मिळते दीपिका पदुकोणच्या नावाची पराठा थाळी, अभिनेत्रीनं दिली 'अशी' प्रतिक्रिया

पुणेकरांनी तर कमालच केलीय. तिचं नाव अशा पदार्थाला दिलं की लोकांना तो आवडेलच आवडेल.

  • Share this:

मुंबई, 02 जानेवारी : बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आहे. एक तर तिचं लग्न, मग झालेली रिसेप्शन्स यामुळे दीपिकाचाच बोलबाला होता. इतका की पुणेकरांनी तर कमालच केलीय. तिचं नाव अशा पदार्थाला दिलं की लोकांना तो आवडेलच आवडेल.

पुण्यात एका हाॅटेलमध्ये एक थाळी मिळते. ती दीपिकाच्या नावे आहे. दीपिका पदुकोण पराठा थाळी असं नाव आहे. त्याची किंमत 600 रुपये आहे. हे हाॅटेलच पराठा मिळण्याचं हाॅटेल आहे. एका युजरनं मेन्यू कार्डाचा फोटो दीपिकाला ट्विट केला. वर लिहिलं, दीपिका पुण्यात तुझी पराठा थाळी आहे. त्यावर तिनं दखल घेत उत्तर दिलं. तिनं स्माइली पाठवलीय.

या हाॅटेलमध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, अक्षय कुमार यांच्या नावानंही पराठे मिळतायत.

रणवीर आणि दीपिका बाॅलिवूडमधले सर्वात आनंदी कपल मानले जातात.दीपिका रणवीरला भेटली, तेव्हा तिच्या मनात वेगळंच होतं. ती म्हणाली, ' 2012ला माझं एक रिलेशनशिप संपल्यावर मी रणवीरला भेटले.मी रणवीरला म्हटलं, आपल्या दोघात काही तरी आहे. मला तू आवडतोस. पण मला ओपन रिलेशनशिपमध्ये राहायचंय. मला कमिटमेंट नकोय. एखाद्या दुसऱ्याबद्दल आकर्षण वाटलं, तर मी त्याच्याकडे जाईन, पण तसं काही झालं नाही.'

फोर्ब्स मासिकानं नुकतीच श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. त्यात बाॅलिवूडच्या अभिनेत्रींनी मोठं यश मिळवलंय. या सगळ्या यादीत अग्रक्रमावर आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण. फोर्ब्स मासिकाच्या पाच श्रीमंतांच्या यादीत स्त्रियांमध्ये दीपिकाचा नंबर वन आहे. दीपिकाची 2018मधली कमाई 112.80 कोटी आहे.तिच्या या कमाईत महत्त्वाचा भाग पद्मावत सिनेमाचा आहे. या सिनेमानं 302कोटींच्या वर कमाई केली होती.

11 वर्षांपूर्वी दीपिकानं ओम शांती ओम सिनेमातून सुरुवात केली. पद्मावत, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर, बाजीराव मस्तानी, रामलीला, ये जवानी है दिवानी हे सहा सिनेमे 100 कोटींच्या घरात गेले. आज दीपिका एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये घेते.

PHOTOS कतरिना कैफने नवीन वर्षाची सुरुवात कशी केली पाहाल तर 'गार' पडाल

First published: January 2, 2019, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading