वडिलांना पुरस्कार घेताना पाहून दीपिका झाली भावुक; व्हिडिओ व्हायरल!

वडिलांना पुरस्कार घेताना पाहून दीपिका झाली भावुक; व्हिडिओ व्हायरल!

आपल्या मुलीच्या आयुष्याकडे पाहताना प्रत्येक पित्याचे डोळे भरून येतात. तसंच प्रत्येक मुलीचंही असंत. असंच काहीस दीपिका पदुकोणसोबतही घडलं.

  • Share this:

30 जानेवारी : प्रत्येक नातं जिव्हाळ्याचं नातं असतं पण त्यात खास असतं ते वडील आणि मुलीचं नात. मग त्यात सर्वसामान्य असोत किंवा बॉलिवूडचे स्टार्स. आपल्या मुलीच्या आयुष्याकडे पाहताना प्रत्येक पित्याचे डोळे भरून येतात. तसंच प्रत्येक मुलीचंही असंत. असंच काहीस दीपिका पदुकोणसोबतही घडलं.

सोमवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या कुटुंबासोबत दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेली होती. या कार्यक्रमात 'बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया' द्वारा दीपिकाच्या वडिलांना म्हणजेच प्रकाश पदुकोण यांना 'लाईफटाईम अचिव्हमेंट' या पुरस्कारानं सन्मामित करण्यात आलं.

आपल्या वडिलांना हा पुरस्कार घेताना पाहुन दीपिकाचे डोळे आनंदाने भरुन आले. ते जेव्हा स्टेजवर पुरस्कार घेण्यासाठी गेले तेव्हा दीपिकाला आनंदाश्रू आवरेणासे झाले. तिने रडत रडत वडिलांना चिअर्स केलं.

तिच्या आयुष्यातला हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रकाश पदुकोण यांच्यासाठीही ही खूप गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार घेत्यावेळी संपुर्ण पदुकोण कुटुंब उपस्थित होतं. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांसाठी हा क्षण खूप मोलाचा आणि आनंदाचा होता.

 

First Published: Jan 30, 2018 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading