Elec-widget

मैत्रिणीच्या लग्नात डान्स करून बिघडली दीपिकाची तब्येत, पाहा कशी झाली अवस्था

मैत्रिणीच्या लग्नात डान्स करून बिघडली दीपिकाची तब्येत, पाहा कशी झाली अवस्था

दीपिकानं तिच्या एका बेस्ट फ्रेंडच्या लग्नाला हजेरी लावली. मात्र यानंतर तिची तब्बेत बिघडली.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिचा आगामी सिनेमा ‘छपाक’मुळे चर्चेत आहे. याशिवाय तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चाही अधूनमधून होत असतात. मात्र दीपिका किंवा रणवीरनं अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं आम्हाला दोघांनाही मुलं आवडतात मात्र अद्याप याबद्दल विचार केलेला नाही आणि आम्ही दोघंही सध्या करिअरचा विचार करत आहोत असं सांगितलं होतं. त्यानंतर नुकतीच दीपिकानं तिच्या एका बेस्ट फ्रेंडच्या लग्नाला हजेरी लावली. मात्र यानंतर तिची तब्बेत बिघडली.

दीपिकानं स्वतःच एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत याबद्दलची माहिती दिली. दीपिकानं नुकतीच तिची बेस्ट फ्रेंड उर्वशी केसवानीच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी रणवीर सुद्धा तिच्यासोबत होता. दरम्यान या लग्नातील दीपवीरचे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण त्यानंतर रविवारी रात्री उशीरा दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेर करत बेस्ट फ्रेंडच्या लग्नात एंजॉय केल्यानंतर तिची हालत काय झाली ते सांगितलं. या फोटोमध्ये ती आजारी असल्यासारखी दिसत आहे. पण ती आजारी नसून लग्नात खूप मस्ती केल्यानं तिला थकवा आला आहे.

VIDEO : रेड ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलानं केला HOT डान्स, चाहते म्हणाले...

या लग्नातील दीपिका आणि रणवीर यांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघंही रणवीरच्या गली बॉय सिनेमातील गाणं अपना टाइम आएगावर डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रणवीरनं यावेळी हे गाणं स्वतः गायलं.

Loading...

नेहा कक्कर झाली Oops Moment ची शिकार, सोशल मीडियावर Video Viral

दीपिका आणि रणवीर 2018 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. येत्या 14 नोव्हेंबरला हे दोघं लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करतील. दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती लवकरच मेघना गुलजारच्या छपाक या सिनेमात दिसणार आहे. तसेच रणवीर सिंहसोबत 83 सिनेमातही दिसणार आहे. लग्नानंतर या दोघांचा हा पहिलाच सिनेमा असून या सिनेमात ती रणवीरच्या आनस्क्रीन पत्नीची म्हणजेच माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे.

कपिल देव की रणवीर सिंह, ‘83’मधील हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत!

==================================================================

नदीशेजारी उलटला रसायनानं भरलेला टँकर; पाण्यावर पांढऱ्या फेसाची चादर, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...