लक्ष्मी अग्रवालच्या मुलीनं पाहिला ‘छपाक’, दीपिका दिसताच अशी दिली रिअ‍ॅक्शन

लक्ष्मी अग्रवालच्या मुलीनं पाहिला ‘छपाक’, दीपिका दिसताच अशी दिली रिअ‍ॅक्शन

छपाक सिनेमाला अनेक सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. पण सर्वात भारी रिव्ह्यू अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हायवर लक्ष्मी अग्रवालच्या मुलगी पीहूनं दिला.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा छपाक सिनेमा रिलीज होण्याआधीच खूप चर्चेत होता. पण रिलीजनंतर या सिनेमाची खूप जास्त चर्चा झाली हा सिनेमा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरला. या सिनेमाला अनेक सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. पण सर्वात भारी रिव्ह्यू अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हायवर लक्ष्मी अग्रवालच्या मुलगी पीहूनं दिला. पीहूनं जेव्हा संपूर्ण सिनेमा पाहिला तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहिल्यावर लक्ष्मी सुद्धा भावुक झाली.

लक्ष्मी अग्रवालनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या मुलीनं छपाक पाहिल्यावर पहिली प्रतिक्रिया काय दिली याचा खुलासा केला. ती म्हणाली, मला माहित नव्हतं की माझ्यासोबत घडलेल्या या घटनेला माझी मुलगी कसं बघेल. बऱ्याच वेळा ती अर्ध्यावरच सोडते. पण हा सिनेमा त्याला अपवाद होता. तिनं छापाक शांतपणे पाहिला. त्यानंतर तिनं मला बरेच प्रश्न विचारले आणि मी सुद्धा तिला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्यानंतर तिनं दीपिकाला जाऊन मिठी मारली. खरं तर मला त्या क्षणांचा व्हिडीओ बनवून सर्वांना दाखवायचा होता की माझ्या मुलीनं माझ्यावर तयार केलेल्या सिनेमावर कशी रिअ‍ॅक्शन दिली.

ऊसाच्या शेतात PHOTO काढून फसली अनन्या पांडे; युजर्स म्हणाले, हिचं स्ट्रगल तर...

 

View this post on Instagram

 

Merry Christmas ❤️ With my Love @pihu_she #blessings #loveforever #merrychristmas #selfie

A post shared by Laxmi Agarwal (@thelaxmiagarwal) on

या मुलाखाती दरम्यान लक्ष्मीसोबत सिनेमाच्या दिग्दर्शिका मेघाना गुलजार सुद्धा होत्या. लक्ष्मी पुढे म्हणाली, या सिनेमानं फक्त माझ्या आवाजाला मजबूती दिली नाही तर मला आणि माझ्यासारख्या अनेकींना सन्मान प्राप्त करुन दिला. आमच्या चांदणी चौकमधील लोक जुन्या विचारांचे आहेत. अगोदर जेव्हा मी बाहेर जात असे तर हे लोक आमची खिल्ली उडवत असत. पण जेव्हा मी आता त्या भागात गेले. तेव्हा तिथल्या एका दुकानदारानं मला आत बोलवलं आणि सॅल्युट केला. या सिनेमामुळे आमच्यासाठी लोकांच्या मनात एवढा आदर निर्माण केला आहे की, त्यामुळे आता आमचं दुःख हलकं होणार आहे.

Shershaah first look रिलीज, सिद्धार्थ मल्होत्राला मिळालं वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट

लक्ष्मीनं या मुलखातीत छपाक सिनेमानंतर लोकांच्या विचारात कसा बदल झाला हे सांगितलं. या सर्व गोष्टींमुळे आपण खूप खूश असल्याचही तिनं यावेळी सांगितलं. या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोणनं लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली असून सिनेमातील दीपिकाच्या व्यक्तिरेखेचं नाव मालती असं आहे.

लंडनमध्ये कॅब ड्रायव्हरच्या वर्तनानं हादरली सोनम कपूर, वाचा नक्की काय घडलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 03:27 PM IST

ताज्या बातम्या