Home /News /entertainment /

Deepika Padukone: 'मनात आत्महत्येचा विचार यायचा तेव्हा 'या' व्यक्तीने सावरलं'; दीपिकाने सांगितला डिप्रेशनमध्ये असतानाचा किस्सा

Deepika Padukone: 'मनात आत्महत्येचा विचार यायचा तेव्हा 'या' व्यक्तीने सावरलं'; दीपिकाने सांगितला डिप्रेशनमध्ये असतानाचा किस्सा

करिअरच्या यशस्वी टप्प्यावर असताना अचानक आलेल्या नैराश्याला दीपिकाने मोठ्या धडाडीने टक्कर दिल्याचं तिने नुकतंच एका मुलाखतीत संगीत. स्वतःच्या आयुष्यातील या कठीण काळाबद्दल ती बोलताना दिसली.

  मुंबई 06 ऑगस्ट: बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत अगदी यशाच्या शिखरावर असताना सुद्धा अनेक कलाकारांना मानसिक असंतुलनचा सामना करावा लागला आहे. आपल्या आयुष्यातील या काळाबद्दल अनेक कलाकार मनमोकळेपणाने बोलताना सुद्धा दिसले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे दीपिका पदुकोण. दीपिका आपल्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना नैराश्याचा सामना करत होती. त्यावेळी तिला अनेक अनुभव आले तसंच तिला अनेकदा आत्महत्या करायचा विचारदेखील मनात आला. त्याचबद्दल तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. दीपिकाने (deepika padukone depression phase) नैरश्याशी झुंज देऊन स्वतःच आयुष्य पुन्हा एकदा सावरलं आहे. तिच्या या काळात मानसिकतेमध्ये होणारे बदल तिच्या आईने बरोबर हेरले असं ती सांगते. तिच्या आईने तिला नैराश्य आलं आहे याची जाणीव दीपिकाला करून देत यासाठी मानसिक आरोग्य तज्ञांची मदत घ्यायला हवी असा सल्लाही दिला. दीपिकाने याबद्दल असं सांगितलं की, “मी माझ्या आईला संपूर्ण श्रेय देऊ इच्छिते की तिने माझ्यातले हे बदल ओळखले आणि मला याची जाणीव करून दिली. माझ्यासाठी ही गोष्ट अनपेक्षितपणे घडली होती. माझ्या आयुष्यात सगळं व्यवस्थित चालू होतं. मी करिअरच्या यशस्वी टप्प्यावर होते. तरी मला एक पोकळी जाणवायची. मी विनाकारण घरी रडायचे. मला अनेकदा झोपून राहावंसं वाटायचं कारण झोप माझ्यासाठी एक स्वतःपासून पळून जायचा सोपा पर्याय झाला होता. अनेक वेळा मनात आत्महत्येचा विचार मनात यायचा. जेव्हा माझे आई वडील बंगलोरवरून घरी भेट द्यायला यायचे तेव्हा मी सगळं व्यवस्थित असल्याचा बुरखा घालून वावरत होते. पण एक दिवस माझ्या आईसमोर माझा बांध फुटला आणि तेव्हा तिला याबद्दल जाणीव झाली.”
  View this post on Instagram

  A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

  दीपिकाने याआधी सुद्धा केबीसीच्या मंचावर आपल्या या काळाबद्दल चर्चा केली आहे. 2014 मध्ये तिला डिप्रेशन आहे याचं निदान झालं. त्यावेळी तिला सतत एक रिकामेपण जाणवत असे असं ती सांगते. तिला एक विचित्र भावना मनात यायची. दीपिकाला तेव्हा याची जाणीव झाली की जर तिला हे असं वाटू शकत तर जगात अशी अनेक लोकं असतील जी या काळातून जात असतील त्यातील एकाचं जरी आयुष्य वाचवलं तरी तिचा प्रयत्न सफल आहे असं तिला वाटलं. दीपिका सध्या मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवण्याच्या हेतूने एक NGO सुद्धा चालवते. येत्या काळात दीपिकाचे अनेक मोठे प्रोजेक्ट सुरु होणार असून 2023 मध्ये येणाऱ्या पठाण सिनेमात तिचा वेगळाच अंदाज दिसून येणार आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Deepika padukone

  पुढील बातम्या