मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दीपिका पादुकोणच्या सोशल मीडियावरील सगळ्या पोस्ट गायब; चाहत्यांना जोरदार धक्का

दीपिका पादुकोणच्या सोशल मीडियावरील सगळ्या पोस्ट गायब; चाहत्यांना जोरदार धक्का

नववर्षाच्या स्वागतासाठी दीपिका पादुकोण (Deepika Padukone)  रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) राजस्थानमध्ये गेली आहे. पण अचानक तिच्या सोशल मीडियावर (Social Media)  सर्व पोस्ट डीलिट झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई,01 जानेवारी: बॉलिवूडची (Bollywood) मस्तानी अर्थात दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone)  सोशल मीडियावरील (Social Media) सगळ्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. हे पाहून तिच्या चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे. तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर आता एकही पोस्ट दिसत नाही. दीपिका बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. इन्स्टाग्रामवर दीपिकाचे 52 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. फेसबुक आणि ट्विटवरही तिला अनेक लोक फॉलो करतात. मग अचानक दीपिकाने सगळ्या पोस्ट डिलीट का केल्या हे तिच्या चाहत्यांना समजत नाही. दीपिका पादुकोणची सोशल मीडिया अकाऊंट हँक झाली का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तर काहींना हा नव्या चित्रपटाच्या प्रमोशनचा फंडा वाटत आहे. काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, नवीन वर्षात तिला सोशल मीडियापासून लांब राहायचं असेल म्हणून तिने हे पाऊल उचललं असेल. काहींना दीपिकाच्या सहीसलामत आहे ना याची भीती वाटत आहे. तुम्ही जर नीट निरखून तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट बघितलंत तर तिने तिचा प्रोफाइल पिक्चर बदललेला दिसत आहे तसंच तिच्या इन्स्टा स्टोरीज देखील दिसत आहेत. त्यामुळे तिचं अकाऊंट हॅक झालेलं नाही तर तिने हे स्वत:च केलं आहे हे दिसून येईल. तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी तिने सगळ्या पोस्ट डिलीट केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीपिका सध्या नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राजस्थानला गेली आहे. तिच्यासोबत रणवीर सिंह तिथे आहे. 2020 या वर्षात दीपिकाच्या आयुष्यात अनेक चढ – उतार आले. ड्रग केसमध्ये नाव आल्यानंतर तिला NCB चौकशीलाही सामोरं जावं लागलं होतं. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती पठाण सिनेमाचं शूट करत आहे. तसंच महाभारत सिनेमामध्येही ती झळकणार आहे दीपिका पहिल्यांदाच प्रभाससोबतही स्क्रीन शेअर करणार आहे. यापैकी काही चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
First published:

Tags: Bollywood actress, Deepika padukone

पुढील बातम्या