दीपिका पदुकोणने तिच्या फॅनसाठी आपल्या इंस्टाग्राम एकांऊटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. दीपिकाच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: कमेंटचा पाऊस पाडला आहे. या व्हिडिओसोबतच दीपिकानं फोटोशूट देखील केलं आहे. ज्या फोटोमध्ये दीपिका रिलॅक्स असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये दीपिकानं ब्लॅक कलरची 'हुडी' घातली आहे. दीपिकानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.
दीपिका पदुकोणचा छपाक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. मात्र, दीपिका लवरकरच तिच्या रिअललाईफ हीरोसोबत म्हणजेच रणवीर सिंगसोबत ‘83’ चित्रपटात झळकणार आहे. भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपची कथा लवकरचं ‘83’च्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Deepika padukone, New viral video