मुंबई, 30 मे : अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मागच्या 12 वर्षात बॉलिवूडमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ज्यामुळे प्रत्येक दिग्दर्शक तिला आपल्या सिनेमात घेण्यासाठी उत्सुक आहे. 'ओम शांति ओम' मधील शांतिप्रिया असो की मग 'पद्मावत'मधील पद्मावती. दीपिकानं प्रत्येक भूमिका तेवढ्याच ताकदीनं साकारली आणि प्रेक्षकांवर आपला वेगळा ठसा उमटवला. यानंतर आता ती लवकरच मेघना गुलजारच्या 'छपाक' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या लुकनंतर दीपिकाचं खूप कौतुकही झालं. या सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दीपिकाला सेटवरच रडू कोसळलं असल्याची माहिती आता समोर आली आहे
'छपाक' हा सिनेमा दिल्लीची अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्यावर आधारित आहे. यामध्ये दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं ही भूमिका माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे असं सांगितलं होतं. या भूमिकेबाबत दीपिका खूप भावूक आहे आणि त्यामुळेच शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तिला रडू आलं. पहिल्या सीनच्या अगोदर दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्याशी चर्चा करताना दीपिका अचानक रडू लागली पण नंतर तिनं स्वतःला सावरलं आणि शूटिंगला सुरुवात केली.
'खुद को बचाओ' कतरिना कैफचा सलमानच्या 'या' अभिनेत्रीला सल्ला
मेघना गुलजार यांचा 'छपाक' हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधरित आहे. 22 एप्रिल 2005मध्ये लक्ष्मीवर अॅसिड हल्ला झाला होता. दीपिकानं 'छपाक'साठी खूप मेहनत घेतली आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ती अनेकदा दिल्लीच्या रस्त्यांवर स्पॉट झाली. सुरुवातीला तर सिनेमातील तिच्या बदललेल्या लुकमुळे तिला ओळखणंही सर्वांना कठीण झालं होतं. या सिनेमात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
...म्हणून 2 कोटींची जाहिरात नाकारली, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
20 वर्षांनंतर मेजर डी.पी. सिंहनी पाहिला 'सर्फरोश', आमिर खान का झाला भावूक?