Chhapaak Trailer : अंगावर शहारे आणणारा 'छपाक', मन हेलावणारा दीपिका पदुकोणचा अभिनय

Chhapaak Trailer : अंगावर शहारे आणणारा 'छपाक', मन हेलावणारा दीपिका पदुकोणचा अभिनय

दीपिकाचा छपाक हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच आपल्या जगावेगळ्या कलाकृतींमुळे चर्चेत असते. आता मात्र दीपिका सर्वांसमोर अंगावर शहारे आणणारी एक कथा घेऊन आली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता दीपिका पादुकोणचा चित्रपट 'छपाक' येत आहे. आजच छपाकचा ट्रेलर रिलीज झाला. दिग्दर्शक मेघना गुलजार यांचा राझीनंतरचा हा आणखी एक दमदार कथानक असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची भुमिका साकारत आहे.

जानेवारी 2018 मध्ये ‘पद्मावत’ मध्ये दीपिका पादुकोण राणी पद्मिनीच्या भूमिकेत दिसली होती. तेव्हापासून त्याचे चाहते त्याला पडद्यावर पाहण्याची वाट पहात आहेत. त्यानंतर आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा दीपीका मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'छपाक' ही कथा अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

दीपिकाबरोबच या चित्रपटात विक्रांत मेस्सी प्रमुख भुमिकेत आहे. या चित्रपटातून लक्ष्मी अग्रवालचा संघर्ष उलघडण्यात आला आहे. या चित्रपटासह दीपिका निर्माती म्हणूनही पदार्पण करत आहे.

दीपिकानं जाळले प्रोस्थेटिक्स

या सिनेमात अ‍ॅसिड हल्ला पीडितेची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी दीपिकानं प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली होती. या लुकसाठी दीपिकाला तासंतास मेकअप करावा लागत असे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं छपाकच्या शूटिंग संपल्यावर शेवटच्या दिवशी तिनं हे प्रोस्थेटिक्स लुक जाळून टाकल्याचा खुलासा केला होता. दीपिका म्हणाली, "मी या प्रोस्थेटिक्सचा एक तुकडा घेतला. अल्कोहोल घेतलं आणि एका कोपऱ्यात नेऊन तो प्रोस्थेटिक्स जाळून टाकला".

कोण आहे लक्ष्मी अग्रवाल

2005मध्ये दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणाऱ्या लक्ष्मी अग्रवालचे जीवन बदलले जेव्हा तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. 16 वर्षांच्या लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावानं लग्नाची मागणी घातली होती. पण नकार मिळाल्यानं त्यानं लक्ष्मीवर अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला. अ‍ॅसिड हल्ल्यामुळे चेहरा विद्रुप झाला मात्र यामुळे निराश न होता लक्ष्मीनं 2006मध्ये जनहित याचिकेद्वारे अ‍ॅसिड हल्ला पीडितांसाठी विशेष कायदे असावेत अशी मागणी केली. अंगावर अ‍ॅसिड फेकण्याचा उल्लेख असलेले कलम सध्याच्या फौजदारी कायद्यात आणि दंडसंहितेत असावे यासाठी आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, अशा मागण्या तिनं न्यायपीठापुढे मांडल्या. तिच्या मागणीला यश आलं 2013मध्ये केंद्र सरकारने विशेष कायदा आणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2019 01:22 PM IST

ताज्या बातम्या