मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Fact Check : दीपिकाच्या ‘छपाक’मध्ये आरोपी नदीमचं नाव राजेश आहे का? वाचा काय आहे सत्य

Fact Check : दीपिकाच्या ‘छपाक’मध्ये आरोपी नदीमचं नाव राजेश आहे का? वाचा काय आहे सत्य

लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव नदीम खान असं होतं मात्र सिनेमात त्या व्यक्तिरेखेचं नाव राजेश असं ठेवण्यात आलं आहे. यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे.

लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव नदीम खान असं होतं मात्र सिनेमात त्या व्यक्तिरेखेचं नाव राजेश असं ठेवण्यात आलं आहे. यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे.

लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव नदीम खान असं होतं मात्र सिनेमात त्या व्यक्तिरेखेचं नाव राजेश असं ठेवण्यात आलं आहे. यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे.

मुंबई, 09 जानेवारी : अभिनेत्री दीपिका पदुकोण जवळपास दोन वर्षानंतर ‘छपाक’मधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 10 जानेवारीला त्याच्या छपाक सिनेमा रिलीज होत आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी तिचा पद्मावत सिनेमा रिलीज झाला होता. ज्यावर ऐतिहासिक मुद्द्यांवरुन काही आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर आता छपाकबाबतही असंच काहीसं होताना दिसत आहे. मागच्या दोन दिवसांपासून या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे दीपिकाच्या विरोधात #BoycottChhapak हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे तर दुसरीकडे तिला पाठिंबा देणारा #ISuportDeepika हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. अशातच आता या सिनेमातील हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव बदलण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला असून त्या व्यक्तीची धार्मिक ओळख पुसण्याचा प्रयत्न केल्याचं काही युजर्सचं म्हणणं आहे.

'छपाक' हा सिनेमा दिल्लीतील अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या रिअल लाइफ स्टोरीवर आधारित आहे. या सिनेमा बद्दल आता ट्विटरवर नवा वाद सुरू झाला आहे. काही युजर्सचं म्हणणं आहे की, लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव नदीम खान असं होतं मात्र सिनेमात त्या व्यक्तिरेखेचं नाव राजेश असं ठेवण्यात आलं आहे. यावरुन मेकर्सनी असं जाणूनबुजून केल्याचं अनेक युजर्सचं म्हणणं आहे.

जुनं ते सोनं! अभिनेत्रींमध्ये वाढतोय चमचमत्या ड्रेसचा ट्रेंड

काही मीडिया रिपोर्टनी असा दावा केला आहे की, राजेश हे अ‍ॅसिड फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव नाही आहे. पण सध्या ट्विटरवर राजेश आणि नदीम खान ही दोन्ही नावं टॉप ट्रेंडमध्ये आहेत. या नावांबाबत आतापर्यंत 1.5 लाखांपेक्षा जास्त ट्वीट करण्यात आले आहेत. मात्र हे सत्य नाही आहे. या सिनेमात अ‍ॅसिड फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव बबलू उर्फ बशीर खान असं आहे. मात्र सिनेमाच्या मेकर्सनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

#BoycottChhapaak नंतर आता #TanhajiChallenge; दीपिकाच्या अडचणी वाढल्या

कोण आहे नदीम खान

आरोपी नदीम खाननं 2005 मध्ये दिल्लीच्या खान मार्केटजवळ लक्ष्मी अग्रवालवर अ‍ॅसिड फेकलं होतं. त्यावेळी नदीमचं वय 32 वर्षं तर लक्ष्मीचं वय 15 वर्षं होतं. असं म्हटलं जातं की नदीमनं लक्ष्मीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता मात्र लक्ष्मीनं त्याच्याशी लग्न करायला नकार दिला. यानंतर 3 व्यक्तींनी लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला केला होता. ज्यात नदीम सुद्धा होता.

एकाही 'हीरो'नं नाही तर, 'या' अभिनेत्रींनी दीपिकाला दिला पाठिंबा

सिनेमामध्ये लक्ष्मीची व्यक्तीरेखा साकरणाऱ्या दीपिकाचं नाव मालती असं ठेवण्यात आलं आहे. तसेच मालतीवर अ‍ॅसिड हल्ला होण्याआधी बबलू आणि मालतीची लव्हस्टोरी सुद्धा दाखवण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Deepika padukone