सलमान-अक्षय जे करु शकले नाही ते या अभिनेत्रींनी करुन दाखवलं

आगामी सिनेमा 'छपाक'मुळे सोशल मीडियावर शेअर चर्चेत असलेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण या सिनेमात दिल्लीची अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालची व्यक्तीरेखा साकारत आहे.

  • Share this:

अभिनेत्री दीपिका पदुकोण आगामी सिनेमा छपाकमुळे साशल मीडियावर चर्चेत आहे. या सिनेमामध्ये ती दिल्लीची अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची व्यक्तीरेखा साकारत आहे. दीपिका या सिनेमात हूबेहूब लक्ष्मी सारखीच दिसत असल्यानं तिच्या लूकची जोरदार चर्चा आहे. मात्र असं करणारी दीपिका पहिली अभिनेत्री नाही. तिच्या अगोदरही काही अभिनेत्रींनी अशा आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. जे आतापर्यंत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांना जमलं नाही ते या अभिनेत्रींनी करुन दाखवलं आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मानं 'झीरो' सिनेमात सेरेब्रल पाल्सी आजाराशी सामना करणाऱ्या मुलीची भूमिका सकारली होती. या पूर्ण सिनेमात ती व्हील चेअरवर बसलेली दिसून येते. ही भूमिका साकारणं सोपं काम नक्कीच नव्हतं. पण ही भूमिका साकारुन अनुष्का शर्मानं स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं.

प्रियांका चोप्रा आणि रणबीर कपूर यांचा 'बर्फी' त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहीला. या सिनेमात प्रियांकानं ऑटिस्टिक मुलीची भूमिका साकारली. ही भूमिका प्रियांकानं एवढी सुंदर पद्धतीनं साकारली की तिच्या या भूमिकेसाठी अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले.

'दम लगा के हैशा' मध्ये अभिनेत्री भूमि पेडणेकरनं एका अशा मुलीची भूमिका केली होती ज्या मुलीची तिच्या वाढत्या वजनामुळे खिल्ली उडवली जात असते. भूमिचा हा पहिलाच सिनेमा होता आणि पहिल्याच सिनेमात ग्लॅमरस भूमिका सोडून अशी भूमिका साकारणं खरंच खूप मोठं आव्हान होतं मात्र भूमिनं ती भूमिका चांगल्या प्रकारे साकारली. या भूमिकेसाठी तिनं आपलं वजनही वाढवलं होतं.

प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांनीही 'सत्यम शिवम सुंदरम' या सिनेमात अर्धवट चेहरा जळलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. या मुलीच्या चेहऱ्यावरील दुःख झीनत यांनी मोठ्या पडद्यावर मोठ्या कौशल्यानं साकारलं. ही त्यांच्या सिने कारकिर्दितील सर्वोत्कृष्ट भूमिका ठरली.

अभिनेत्री कल्की कोचलिननं सुद्धा 'मार्गरीटा विथ द स्ट्रॉ' या सिनेमात सेरेब्रल पाल्सी पीडीतेची भूमिका साकारली होती. ही भूमिका, या भूमिकेतील आव्हानं, त्या पीडीतेचं दुःख हे सर्व मोठ्या पडद्यावर साकारणं खरंच कठीण काम होतं मात्र कल्कीनं या भूमिकेतून स्वतःला सिद्ध केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 08:56 AM IST

ताज्या बातम्या