Chhapaak vs Tanhaji Box Office Collection Day 1: छपाक Vs तानाजी, पहिल्या दिवशी कुणी केली जास्त कमाई?

Chhapaak vs Tanhaji Box Office Collection Day 1: छपाक Vs तानाजी, पहिल्या दिवशी कुणी केली जास्त कमाई?

दीपिका की अजय?, पहिल्या दिवशी कोण ठरलं वरचढ!

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जानेवारी : दीपिका पदुकोनचा (Deepika Padukone) सिनेमा छपाक 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला होता. त्यातच अजय देवगणचा तानाजी (Tanhaji: The Unsung Warrior) आणि छपाक (Chhapaak) एकाच दिवशी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर मात्र दोन्ही सिनेमांमध्ये अटीतटीची स्पर्धा असल्याचे दिसत आहे. छपाकनं पहिल्या दिवशी 8 कोटींची कमाई केली. तर तानाजी सिनेमानं पहिल्याच दिवशी 18 कोटींची कमाई केली.

दीपिकानं नवी दिल्लीतील जेएनयू हिंचारानंतर विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर छपाकवर बंदी घालण्याची मागणी काही चाहत्यांनी ट्विटरवर केली होती. त्यातूनच सोशल मीडियावर #BoycottChhapaak ट्रेंड होत होता. त्याचा फटका दीपिकाला पहिल्या दिवशी बसला. त्यामुळं अप्रत्यक्षरित्या या सगळ्याचा फायदा तानाजी सिनेमाला झाला. एवढेच नाही तर, काँग्रेस प्रशासित तीन राज्यांनी छपाक या दीपिका पदुकोणच्या चित्रपटाला अगोदरच करमुक्त करण्याची घोषणा केली आहे.

वाचा-Tanhaji रीलिज होताच JNU बद्दल बोलला अजय देवगण; नाव न घेता दीपिकाला दिला सल्ला?

वाचा-Chhapaak टॅक्स फ्री करण्याची आव्हाडांची भूमिकेवरून Twitter युद्ध

दीपिका पादुकोणच्या 'छपाक' चे बजेट सुमारे 35 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 'छापाक' ची कथा मालती म्हणजेच अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या हिच्या जीवनावर आधारित आहे. तर, तानाजी हा सिनेमा अजय देवगणचा 100वा सिनेमा असून तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे.

वाचा-काँग्रेसशासित तीन राज्यांनी दीपिकाच्या 'छपाक'बाबत घेतला मोठा निर्णय

अजय देवगण यांच्या 'तन्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने उत्तर भारतात पहिल्या दिवशी शानदार ओपनिंग केली. तर दक्षिण भारतातील रजनीकांत यांच्या 'दरबार' चित्रपटाचा दबदबा दिसला.

छपाक सापडला होता वादात

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या 'छपाक'वरून सध्या देशभर चर्चा सुरू आहे. दीपिका जेएनयुमधल्या विद्यार्थ्यांना भेटायला गेली आणि वादाची ठिणगी पडली. 'छपाक'वर बहिष्कार घाला अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव नदीम खान असं होतं मात्र सिनेमात त्या व्यक्तिरेखेचं नाव राजेश असं ठेवण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर या बातम्या फेक असल्याचे समोर आले होते.

Published by: Priyanka Gawde
First published: January 11, 2020, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading