कुणीतरी येणार गं! दीपिकाच्या ‘त्या’ कमेंटमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

कुणीतरी येणार गं! दीपिकाच्या ‘त्या’ कमेंटमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

दीपिकानं रणवीर लाइव्ह आल्यावर दीपिकानं त्यावर कमेंट करणं हे त्यांच्या चाहत्यांसाठी अजिबात नवीन गोष्ट नव्हती. मात्र तिनं त्या कमेंटमध्ये असं काही लिहिलं जे वाचल्यावर सर्वच अवाक झाले.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील क्यूट कपल मानलं जातं. हे दोघंही नेहमीच अनोख्या अंदाजात प्रेक्षाकांना आश्चर्याचे धक्के देत असतात. मग ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करणं असो किंवा मग एकमेकांच्या फोटोवर कमेंट करणं असो. यावेळी काहीसं असंच झालं आहे. ज्यावेळी रणवीर सिंग इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला. रणवीर लाइव्ह आल्यावर तिथं चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडू लागला. ज्यात दीपिका पदुकोणचाही समावेश होता. मात्र तिच्या कमेंटनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

दीपिकानं रणवीर लाइव्ह आल्यावर दीपिकानं त्यावर कमेंट करणं हे त्यांच्या चाहत्यांसाठी अजिबात नवीन गोष्ट नव्हती. मात्र तिनं त्या कमेंटमध्ये असं काही लिहिलं जे वाचल्यावर सर्वच अवाक झाले. दीपिकानं रणवीरच्या लाइव्ह व्हिडीओवर हाय डॅडी अशी कमेंट केली. ज्यामुळे चाहत्यांना 2019च्या कान्स फेस्टिव्हलच्या चर्चांची आठवण झाली. या फेस्टिव्हलमधील दीपिकाच्या फोटोवरून ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्यावेळी या रणवीर-दीपिकानं त्या अफवा असल्याचं म्हटलं होतं.

आशा भोसलेंनी पाकिस्तानला असं केलं ट्रोल, नेटकरी झाले खूश

 

View this post on Instagram

 

From ranveer's IG live yesterday Wifey deepika joined too "Hi Daddie...👋👶❤" Arjun kapoor "Baba Bhabi gonna give u one" I hope it's true they will become parents • • • • @ranveersingh @deepikapadukone •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• #deepveer #deepveerlove #deepveercutemoments #deepveerkishaadi #deepveerreception #deepveermoments #deepveeranniversary #deepveerwedding #deepveerforever #kingofhearts #queenofhearts #deepveerians5

A post shared by About deepveer (@deepveeriansindofc) on

दीपिकाच्या अशा कमेंटमुळे मात्र आता या अफवा खऱ्या होत्या का असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. तिच्या या कमेंटचा अर्थ तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एवढंच नाही तर रणवीरणंही या व्हिडीओमध्ये मोठ्यानं ओरडून हाय बेबी म्हणाला. खरी गंमत तर यानंतर घडली. जेव्हा अर्जुन कपूरनं दीपिकाच्या कमेंट खाली आणखी एक कमेंट केली. त्यानं लिहिलं, ‘Baba Bhabi gonna give u one.’ यामुळे आता पुन्हा एकदा दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाला आहे.

SPECIAL REPORT: आता सरकारी योजनेतून मिळणार फक्त एक घर?

दीपिका खरंच प्रेग्नन्ट आहे की नाही हे तर फक्त तिला आणि रणवीरलाच माहित आहे. मात्र त्यांनी याबाबतचा कोणताही खुलासा केलेला नाही. काही दिवसांपूर्वी दीपिकाला एका मुलाखतीत रपणवीर बाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी तिनं ‘83’ मधील रणवीरसोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला. तसेच रणवीरपासून आपल्या डिप्रेशनबाबत कसं लपवून ठेवलं होतं हेही सांगितलं. यावेळी तू रणवीरला का पसंत करतेस हेही दीपिकाला विचारण्यात आलं त्यावेळी तिनं ‘कपडे आणि व्हॅनिटी’ असं उत्तर दिलं. तसं पाहायला गेलं तर रणवीरला वेगवेगळ्या कपड्यांचं किती आकर्षण आहे हे सर्वांनाच माहित आहे. दीपिका सध्या रणवीर सिंह सोबत ‘83’मध्ये काम करत आहे. याशिवाय ती मेघना गुलजारच्या छपाक सिनेमात विक्रांत मेस्सी सोबत दिसणार आहे.

श्रीदेवी यांच्या जीवनप्रवासाला एक नवं वळण, उलगडणार सर्व रहस्य?

=================================================================

SPECIAL REPORT: अक्षयकुमारच्या 'मिशन मंगल'वर का लागला 'अँटी हिंदू'चा ठपका?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 11:04 AM IST

ताज्या बातम्या