VIRAL VIDEO : फोटोग्राफरनं म्हटलं ‘दीपू जी’, अशी होती दीपिकाची प्रतिक्रिया

VIRAL VIDEO : फोटोग्राफरनं म्हटलं ‘दीपू जी’, अशी होती दीपिकाची प्रतिक्रिया

एअरपोर्टमधून बाहेर निघताना दीपिकाला त्या गर्दीतून एका फोटोग्राफरनं तिला दीपू जी अशी हाक मारली.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर : अभिनेत्री दीपिका पदुकोण मागच्या काही दिवसांपासून तिचा आगामी सिनेमा ‘छपाक’मुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. सध्या दीपिका या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. पण या दरम्यान दीपिकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती कोणत्यातरी एअरपोर्टमधून बाहेर निघताना दिसत आहे आणि नेहमीप्रमाणे तिला फोटोग्राफर्सनी घेरलं. इतक्यात त्या गर्दीतून एका फोटोग्राफरनं तिला दीपू जी अशी हाक मारली. हे ऐकल्यावर दीपिकाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

दीपिका एअरपोर्टवरुन निघत होती अशातच अनेक फोटोसाठी पोझ देण्याची विनंती करत होते. या दरम्यानंच एका फोटोग्राफरनं तिला दीपू जी म्हणून हाक मारली. हे ऐकल्यावर सुरुवातीला दीपिका हलकीशी हसली आणि पुढे निघून गेली. पण जेव्हा ती कारमध्ये बसत होती त्यावेळी तिनं या फोटोग्राफरला त्याचं नाव विचारलं. त्यानं त्याचं नाव छोटू पांडे असल्याचं सांगितलं. त्यावर दीपिकानं त्याला पांडू जी अशी हाक मारली आणि थँक्यू म्हणून निघून गेली.

Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्ला घेतो ड्रग्स? रश्मि देसाईच्या आरोपानं खळबळ

 

View this post on Instagram

 

#deepikapadukone #snapped at #airport in Mumbai #yogenshah @yogenshah_s

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

दीपिकाची ही क्यूट प्रतिक्रिया सर्वांनाच खूप आवडलेली दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ जर्नलिस्ट योगेन शाहनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्टचा असल्याचं बोललं जात आहे. यावेळी दीपिका ग्रे रंगाचं हाय नेक स्वेटर आणि डार्क रंगाच्या ट्राउझरमध्ये दिसली. या लुकमध्ये ती खूपच स्टायलिश दिसत होती.

ऐकावं ते नवलच! कामाच्या व्यापात अंघोळ करायची विसरली अभिनेत्री, ट्विटरवर लिहिलं..

दीपिकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा छपाक हा सिनेमा 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात ती दिल्लीच्या लक्ष्मी अग्रवालची व्यक्तीरेखा साकारत आहे. याशिवाय ती रणवीर सिंहसोबत 83 सिनेमातही त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

'शोषणासाठी पॉवरफुल पदाचा वापर केला जात असेल तर...' सनी लिओनीनं दिला मोलाचा सल्ला

Published by: Megha Jethe
First published: December 22, 2019, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading