News18 Lokmat

दीपिका- रणवीर पुन्हा चालले सप्तपदी, रणबीर कपूर होता साक्षीदार

दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत दोघांचे डिनर डेट, एअरपोर्ट आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 08:21 PM IST

दीपिका- रणवीर पुन्हा चालले सप्तपदी, रणबीर कपूर होता साक्षीदार

मुंबई, २० मार्च- दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने गेल्यावर्षी डेस्टिनेशन वेडिंग केलं. दोघांनी इटलीत अगदी काही लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत दोघांचे डिनर डेट, एअरपोर्ट आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते.

नुकतेच दोघं झी सिनेअवॉर्ड २०१९ मध्ये गेले होते. दीपिकाने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये दोघं पुन्हा एकदा सप्तपदी चालले. यावेळी हे लग्न खासगी स्वरुपात नव्हते. ऑडियन्समध्ये दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरही बसला होता.

रणबीर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नाचा साक्षीदार झाला. दीपिका- रणवीरने खासगी लग्न केलं होतं. यामुळे त्यांच्या चाहत्यांना दोघांच्या लग्नाच्या विधी पाहता आलं नव्हतं. आता अवॉर्ड फंक्शनमुळे चाहत्यांची त्यांचं लग्न पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. सध्या दोघांचं सप्तपदी घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


हा शो कार्तिक आर्यन आणि विकी कौशलने होस्ट केला होता. दोघांनी पुन्हा एकदा रणवीर- दीपिकाचं लग्न लावून दिलं. दीपिका लवकरच छपाक सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिला सिनेमा असणार आहे. तर सध्या रणवीर ८३ या त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

Loading...


हा सिनेमा १९८३ वर्ल्ड कपवर आधारित आहे. या सिनेमात रणवीर १९८३ क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी रणवीर सिंबा आणि गली बॉय सिनेमात दिसला होता. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट झाले होते.

PM Narendra Modi Trailer- सिनेमातून दिसणार विवेक ओबेरॉयचा 'मोदी अवतार'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 08:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...