VIDEO : लवरंजनच्या ऑफिसबाहेर पुन्हा एकत्र दिसले रणबीर-दीपिका

VIDEO : लवरंजनच्या ऑफिसबाहेर पुन्हा एकत्र दिसले रणबीर-दीपिका

हे दोघं एकेकाळी त्यांच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत होते. मात्र काही कारणानं त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण जेव्हाही मोठ्या पडद्यावर एकत्र आले. त्यावेळी एक वेगळीच जादू दिसली आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांनी खूप पसंत केली आहे. पण त्यापेक्षाही हे दोघं एकेकाळी त्यांच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत होते. मात्र काही कारणानं त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि ते वेगळे झाले. पण त्यांनी 'बचना ए हसिनो', 'तमाशा' आणि 'ये जवानी है दिवानी' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. या सर्वच सिनेमामध्ये त्यांची वेगळीच केमिस्ट्री पहायला मिळाली. त्यानंतर आता हे दोघं पुन्हा एकदा एका सिनेमात एकत्र दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. नुकतंच या दोघांना लव रंजनच्या ऑफिस बोहेर एकत्र स्पॉट झाले आहेत.

वयाच्या 17 वर्षीच जुळ्या मुलांची आई झाली होती Nach Baliye 9 ची 'ही' स्पर्धक

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लव रंजन एका नव्या प्रोजेक्टवर काम करत असून आपल्या आगामी सिनेमासाठी ते रणबीर आणि दीपिकाला घेण्याचा त्यांचा विचार आहे. याशिवाय या सिनेमात अजय देवगणचीही महत्त्वाची भूमिका असणार असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात तो रणबीरच्या वडीलांची भूमिका साकारणार असल्याच्याही चर्चा आहेत. या सिनेमाच्या नावाविषयी अद्याप काहीही माहिती मिळालेली नसली तरीही तरी हा सिनेमा या वर्षाच्या अखेर पर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे. याच सिनेमाच्या निमित्तानं दोघांनीही लव रंजन यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वयाच्या साठीत तरुण हिरोईनबरोबर दिले होते बोल्ड सीन

View this post on Instagram

#ranbirkapoor #deepikapadukone last night for a meeting with Luv Ranjan #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रणबीर आणि दीपिका या आधीही काही सिनेमांमध्ये एकत्र दिसले असल्यानं आता ही बातमी खरी असेल तर त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर दीपिकाचे ‘83’ आणि ‘छपाक’ हे दोन सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 83 मध्ये ती रणवीर सिंहच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. तर छपाक ही दिल्लीतील अ‍ॅसिड हल्ला पिडितेची कथा आहे. तर रणबीरचा अयान मुख्र्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो पहिल्यांदाच गर्लफ्रेंड आलिया भटसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय या सिनेमात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

पहिल्याच सिनेमानं केली होती ऑस्करवारी, एकेकाळची सुपरस्टार ‘ती’ सध्या काय करते?

=============================================================

छोट्या एक शिंगी गेंड्याची मोठी अंघोळ, शॉवर बाथचा VIDEO व्हायरल

First published: July 20, 2019, 2:37 PM IST

ताज्या बातम्या