मुंबई, 18 नोव्हेंबर : दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या ऑनस्क्रीन जोडीचे अनेक चाहते आहेत. 2015 मध्ये रिलीज झालेल्या तमाशा सिनेमात ही जोडी शेवटची दिसली होती. त्यानंतर या दोघांनी कोणत्याही सिनेमात एकत्र काम केलेलं नाही. पण तरीही त्यांच्या अनेक फॅनपेज वरुन त्यांचे व्हिडीओ शेअर केले जातात. रणबीरच्या एका फॅनपेज वरुन असाच व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. ज्यात आदित्य रॉय कपूरच्या वाढदिवसाला पैसे घेऊन रणबीर-दीपिकानं त्याला शुभेच्छा दिल्याची पोलखोल झाली आहे.
अभिनेता आदित्य रॉय कपूरनं रविवारी 34 वा वाढदिवस साजरा केला. याच निमित्तानं रणबीरच्या एका फॅनपेजवरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये दीपिका आणि रणबीर आदित्य रॉय कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. यावेळी याचे आपल्याला पैसे मिळणार आहेत असं रणबीर दीपिकाला सांगताना दिसत आहे. आदित्य रॉय कपूरला त्याच्या ‘आशिकी 2’ या सिनेमासाठी ओळखलं जातं. याशिवाय त्यानं रणबीर दीपिकासोबत ‘ये जवनी है दिवानी’मध्येही काम केलं आहे.
अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेणाऱ्या या अभिनेत्रींच्या नावावर हिट होतात सिनेमा!
दीपिका आणि रणबीरचा हा व्हिडीओ फक्त विनोदाचा भाग आहे. रिअल लाइफमध्ये हे तिघंही खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे दीपिका आणि रणबीर या व्हिडीओमध्ये आदित्यची खिल्ली उडवताना दिसत आहेत. रणबीर दीपिकाला विचारतो. तो आशिकी 2 वाला मुलगा त्याचं नाव काय आहे. त्यावर दीपिका राहुल रॉयचं नाव घेते पण नंतर ती आदित्यला ओळखून म्हणते ‘अरे तो ज्याला घामाचा घाणेरडा वास येतो.’ नंतर हे दोघंही त्याला विश करतात. हा व्हिडीओ भलेही जुना असला तरीही या तिघांच्या दोस्ती आणि मस्तीच्या आठवणी ताज्या करत आहे.
...आणि हॉटेलच्या खिडकीतून उतरली विद्या बालन Video व्हायरल
आदित्य रॉय कपूर लवकरच दिशा पाटनीसोबत मलंग सिनेमात दिसणार आहे. रविवारी आदित्यच्या वाढदिवसानिमित्त या सिनेमाचा फर्स्ट लुक सुद्धा रिलीज करण्यात आला.
या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाने केला अपघात, आता मागतोय नवीन महागडी कार
==================================================================