सोशल मीडियावर सर्वाधिक प्रसिद्ध आहेत बॉलिवूडच्या 'या' दोन अभिनेत्री

सोशल मीडियावर सर्वाधिक प्रसिद्ध आहेत बॉलिवूडच्या 'या' दोन अभिनेत्री

सोशल मीडियावरचे फॉलोअर्स एखाद्याच्या प्रसिद्धीची पावतीच असते. आणि त्यात सिनेस्टार्स आणि त्यांचे फॅनफॉलोअर्सची तर बातच काही और आहे.

  • Share this:

10 फेब्रुवारी : सोशल मीडियावरचे फॉलोअर्स एखाद्याच्या प्रसिद्धीची पावतीच असते. आणि त्यात सिनेस्टार्स आणि त्यांचे फॅनफॉलोअर्सची तर बातच काही और आहे. सध्या सोशल मीडियावर फॅनफॉलोअर्सची धूम सुरू आहे. त्यात दीपिका पदुकोण आणि देसी गर्ल प्रियांका चोप्राचे असंख्य फॉलोवर्स आहेत.

नुकतंच एका रिपोर्टनुसार सोशल मीडियावरील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या टॉप 10 सेलिब्रिटींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दीपिका आणि प्रियांकाच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत दीपिका तिसऱ्या तर प्रियांका आठव्या स्थानी आहे. म्हणजेच प्रियांकापेक्षा दीपिकाचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोर्वस आहेत. एकुणच काय तर दीपिका आता सोशल मीडियावरही क्वीन झाली आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब आणि गूगल प्लस या प्रसिद्ध सोशल हँडलवर चाहत्यांनी दीपीका आणि प्रियांकाला जोरदार पसंती दिली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2018 04:47 PM IST

ताज्या बातम्या