मुंबई, 7 मे : मेट गाला 2019ची चर्चा यंदा परदेशापेक्षा भारतात जास्त झाली. यावर्षी दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री मेट गालामध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती प्रियांका चोप्राच्या विचित्र लुकची. प्रियांकाच्या या लुकचं परदेशात खूप कौतुक झालं असलं तरीही भारतात मात्र तिला ट्रोल करायची एकही संधी नेटीझन्सनी सोडली नाही. सध्या तिच्या लुकवर तयार झालेले अनेक भन्नाट मीम्स सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. नुकताच प्रियांकानं सोशल मीडियावर या इव्हेंटच्या नाइट पार्टीचा एक फोटो शेअर केला. ज्यावरुन नेटकऱ्यांनी आता दीपिका आणि प्रियांकाच्या मेट गाला लुकची तुलना करायला सुरुवात केली आहे.
मेट गालाच्या नाइट पार्टीचा एक फोटो प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ती पती निक जोनस आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोला प्रियांकानं 'चार्ली अँड द इंडियन एंजल्स' असं कॅप्शन दिलं आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोवरुन पुन्हा एकदा त्यांच्या मेट गाला लुकची तुलना होऊ लागली आहे.
एककीकडे प्रियांका तिच्या विचित्र लुकमुळे मीम्सची शिकार ठरत आहे तर दुसरीकडे दीपिका मात्र तिच्या हटके लुकनं चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. मेट गाला 2019मध्ये दीपिकनं Zac Posenचा डिज्नी प्रिन्सेस ड्रेस परिधान केला होता. दीपिकाचा हा लुक इतरांच्या अतरंगी स्टाइलमध्ये रहूनही हटके ठरला. त्यामुळे आता भारतात दीपिका आणि प्रियांका अशी तुलना पाहायला मिळत आहे.
दीपिकाच्या या ड्रेसवर 3D प्रिंटेंड पीस लावण्यात आले होते. ज्यामुळे या ड्रेसला एम्ब्रॉडरी लुक मिळत होता. त्यामुळे दीपिकाची तुलना बार्बी डॉल सोबत करण्यात येत आहे. तर प्रियांकाच्या ड्रेस आणि हेअरस्टाइलवर लोक मीम्स बनवताना दिसत आहेत. काहींनी प्रियांकाला करंट लागलाय असं म्हटलंय तर काहींनी तिच्या केसांना चक्क चिमणीच्या घरट्याची उपमा देऊन टाकली आहे. अशाप्रकारे लुकवरून ट्रोल होण्याची प्रियांकाची ही पहिलीच वेळ नाही याआधी 2017मधील तिच्या मेट गाला ड्रेसवरूनही तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
प्रियांका चोप्राच्या 'मेट गाला लुक'वर नेटकरी सैराट, 'हे' भन्नाट मीम्स एकदा पाहाच
20 लाखांचं मंगळसुत्र, 90 लाखाची अंगठी, एवढे महागडे दागिने घालतात बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री