मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Deepika Padukone च्या नव्या चित्रपटाची घोषणा, जाणून घ्या Release Date

Deepika Padukone च्या नव्या चित्रपटाची घोषणा, जाणून घ्या Release Date

Deepika Padukone

Deepika Padukone

दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) शकुन बत्रासोबत(Shakun Batra) तिच्या अनटाइल्ड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून कधी रिलीज होणार आहे? याची घोषणा केली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 20 डिसेंबर: दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) शकुन बत्रासोबत(Shakun Batra) तिच्या अनटाइल्ड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून तिचा हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे? याची घोषणा नुकतीचं तिनं केली. तिने ही माहिती चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत दिली आहे.

दीपिका पदुकोणच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी पूर्ण झाले आहे. मात्र, आतापर्यंत या चित्रपटाच्या नावाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती.

एका पोस्टद्वारे चाहत्यांची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती दीपिकाने काल दिली होती. 'चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उद्या म्हणजेच 20 डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. ती लिहिते- ' माझ्या अंतःकरणातील प्रेम आणि कृतज्ञतेसह, मी माझ्या प्रेमाचे श्रम तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही... उद्याच्या घोषणेसाठी कनेक्ट रहा!' असे तिने काल केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

सांगितल्याप्रमाणे दीपिकाने चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. चित्रपटाचा टिझर शेअर करत, मेरा दिल... गहराइयां 25 जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. अशी कॅप्शनमध्ये माहिती दिली आहे.

या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) देखील दिसणार आहेत.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या तिचा आगामी चित्रपट 83 (83 Movie) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

First published:

Tags: Ananya panday, Deepika padukone, Entertainment