...म्हणून दीपिकानं सोडला 'सपनादीदी'

विशाल भारद्वाजचा 'सपना दीदी' सिनेमा तिनं सोडलाय. त्याची साइनिंग अमाऊंटही तिनं परत केलीय.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2018 05:17 PM IST

...म्हणून दीपिकानं सोडला 'सपनादीदी'

मुंबई, 9 सप्टेंबर : दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेत असते. कधी ती डिप्रेशन कसं घालवायचं यावर सल्ले देत असते, कधी एखाद्या फॅशन शोमध्ये ती दिसते, तर कधी तिच्या लग्नाच्या चर्चेत. पण आता बातमी अशी आहे की दीपिकानं एक मोठा सिनेमा सोडलाय.

विशाल भारद्वाजचा 'सपना दीदी' सिनेमा तिनं सोडलाय. त्याची साइनिंग अमाऊंटही तिनं परत केलीय. विशाल भारद्वाज इरफान खान आणि दीपिकाला घेऊन सपना दीदी करणार होता. पण दीपिकानं हा सिनेमा सोडताना सांगितलं, इरफान परत आला की मी हा सिनेमा करेन. शिवाय तिचं आणि रणवीरचं लग्न नोव्हेंबरमध्ये आहे. त्यामुळेही तिनं हा निर्णय घेतला असावा.

सध्या दीपिका कुठलाच सिनेमा स्वीकारत नाहीय. काही दिवसांपुर्वी अशी बातमी सगळीकडे पसरली होती की या दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत साखरपुडा केला. त्यानंतर असं समोर आलं की अनुष्का आणि विराट प्रमाणेच हे दोघे इटलीमध्ये लग्न करणार आहेत.

फिल्मफेअरच्यानुसार दीपिका-रणवीर 20 नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार आहेत. गेस्ट लिस्टबद्दल बोलायचं झालं तर लग्नात ठराविक जवळच्याच लोकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये पण फक्त 30 जणांचा समावेश आहे.

अक्षयचं हे फिटनेस रुटिन तुम्हाला जमणं अशक्यच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2018 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...