Home /News /entertainment /

Gehraiyaan चित्रपटाचं title song release, एका तासात एक मिलियनहून अधिक Views

Gehraiyaan चित्रपटाचं title song release, एका तासात एक मिलियनहून अधिक Views

Gehraiyaan

Gehraiyaan

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या सिनेमामुळं चर्चेत आहे. दरम्यान, आता त्याचे टायटल साँग रिलीज झाले आहे. एका तासात एक मिलियनहून अधिक व्हूज मिळाले आहेत.

  नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या सिनेमामुळं चर्चेत आहे. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. दरम्यान, आता त्याचे टायटल साँग रिलीज झाले आहे. एका तासात एक मिलियनहून अधिक व्हूज मिळाले आहेत. दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) स्वतः च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टायटल साँग चा व्हिडीओ शेअर ही माहिती दिली आहे. All Day…Everyday #Gehraiyaan Title Track Out Now! असे दीपिकाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
  हे गाणं गीतकार अंकुर तिवारी यांनी लिहिलं आहे. तर या गाण्याला OAFF आणि सवेरा यांनी संगितबद्ध केलं आहे. तसंच गायिका लोथिकाने हे गाणं गायलं आहे. ‘तू मर्ज हैं दवा भी, पर आदत है हमें, रोका हैं खुद को लेकिन हम रह ना सके’ या गाण्याचे बोल आहेत. दीपिकाचा हा पहिला ओटीटीवरचा (OTT) पहिला सिनेमा आहे. ‘गहराइयां’ चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्राने केलं आहे. हा चित्रपट येत्या 11 फेब्रुवारीला अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होतोय. या चित्रपटात दीपिकाने अलिशाची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी लीड रोलमध्ये आहेत. याशिवाय धैर्य करवा, नसीरूद्दीन शाह, रजत कपूर हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Ananya panday, Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Deepika padukone, Entertainment

  पुढील बातम्या