मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कार्तिक आर्यनसोबत काम करण्यासाठी दीपिका-कतरिनामध्ये चुरस, कबीर खान करतोय दिग्दर्शन

कार्तिक आर्यनसोबत काम करण्यासाठी दीपिका-कतरिनामध्ये चुरस, कबीर खान करतोय दिग्दर्शन

 बॉलिवूडचा हिट मशिन कार्तिक आर्यन कबीर खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे. याविषयी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

बॉलिवूडचा हिट मशिन कार्तिक आर्यन कबीर खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे. याविषयी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

बॉलिवूडचा हिट मशिन कार्तिक आर्यन कबीर खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे. याविषयी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

मुंबई, 22 जुलै : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aryan). कार्तिक आर्यनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. कार्तिक तरुणींच्या गळ्यातील ताईतच बनला आहे. नुकतंच त्याचा प्रदर्शित झालेला सिनेमा भूल भूलैया 2 नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. यामुळे कार्तिकही चांगलाच प्रकाश झोतात आला. भूल भूलैयानंतर आता कार्तिक त्याच्या पुढच्या सिनेमासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूडचा हिट मशिन कार्तिक आर्यन कबीर खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे. याविषयी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

कार्तिक आर्यननं त्याचा आगामी चित्रपट कबीर खानसोबत साईन केला आहे. आता या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री शोधायची बाकी आहे. या सिनेमासाठी दोन आघाडीच्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी दीपिका पादुकोण आणि कतरिन कैफचा विचार केला जात आहे.  दोघींनीही यापहिलेही कार्तिकसोबत काम करण्यास रस दाखवला आहे. त्यामुळे कार्तिक सोबत कोणत्या अभिनेत्रीची वर्णी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -  Ranveer singh Nude Photoshoot: रणवीरआधी अनेक कलाकारांनी केलंय न्यूड फोटोशूट, 'या' मराठी कलाकारांचाही समावेश

नुकताच कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात कार्तिकसोबत कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमालीची जादू दाखवली. या चित्रपटाची जादू अनेक आठवडे पहायला मिळाली. कार्तिनं केलेल्या भूमिकेविषयी त्याचं खूप कौतुक करण्यात आलं. त्याच्या चाहत्यांनी तर त्याला भरभरुन प्रेम दिलेलं पहायला मिळालं.

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

दरम्यान, कार्तिक आर्यननं अनेक विविध भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडमध्ये सध्या अनेक वैविध्यपूर्ण सिनेमांची मेजवाणी समोर येणार आहे. यामध्ये काही फ्रेश जोड्याही आपल्याला पहायला मिळणार आहे. त्यामुळे कार्तिकसोबत कोणती अभिनेत्री झळकणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Deepika padukone, Kartik aryan, Katrina kaif, Upcoming movie