JNU मध्ये गेल्याने छपाकनंतर आता दीपिकाला 'असा' फटका!

JNU मध्ये गेल्याने छपाकनंतर आता दीपिकाला 'असा' फटका!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिकाने जेएनयुमध्ये हजेरी लावल्यानंतर तिची प्रमुख भूमिका असलेल्या छपाक या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. याचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरच्या कमाईवर झाल्याचं दिसतं.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात विरोध प्रदर्शने झाली. त्याचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने जेएनयुमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. दीपिकाने या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर तिची प्रमुख भूमिका असलेल्या छपाक चित्रपटाला फटका बसला आहे. आता दीपिकाने ज्या जाहिरातींमध्ये काम केलं आहे अशा जाहिराती दाखवण्याचे प्रमाणही कमी करण्यात आलं आहे.

काही ब्रँड्सनी दिपिका असलेल्या जाहिरातींचे प्रमाण कमी केलं आहे. येत्या काही काळात जाहिरातींच्या करारामध्ये काही नियम किंवा अटी वाढवल्या जातील ज्यामध्ये सेलिब्रेटींकडून राजकीय भूमिका किंवा प्रशासनाचा रोष ओढवेल अशा कृतीबद्दल स्पष्ट केलं असेलं असंही व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे. कोका-कोला आणि अॅमेझॉन या कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या IPG मीडियाब्रॅड्स चे प्रमुख शशि सिन्हा यांनी सांगितलं की, सर्वसामान्यपणे ब्रँड्स सावध भूमिका घेतात. ते कोणत्याही वादात पडू इच्छित नसतात.

एका कंपनीच्या एक्झिक्युटीवने सांगितलं की, एका ब्रँडने आम्हाला सांगितलं आहे की दीपिका असलेल्या जाहीरातीला दोन आठवड्यासाठी थांबवण्यात आल्या आहेत. तोपर्यंत वाद निवळेल अशी आशा आहे. दरम्यान, दीपिकाच्या जाहीरातींचे प्रक्षेपण कमी केलं असलं तरी ब्रँडने तिच्यासोबतचा जाहिरातींच्या कराराबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही.

दीपिकाच्या छपाकनं दुसऱ्या दिवशीही दाखवला दम, केली इतक्या कोटींची कमाई

दीपिका ब्रिटानियाच्या गुडडे, लॉरिलयल, तनिष्क, विस्तारा एअरलाइन्स आणि अॅक्सिस बँकेसह इतर काही ब्रँडसाठी जाहीराती करते. तिची नेटवर्थ 103 कोटी इतकी आहे. ट्विटरवर दीपिकाचे 2.68 कोटी फॉलोअर आहेत. एका चित्रपटासाठी दीपिका 10 कोटी तर जाहीरातीसाठी 8 कोटी रुपये मानधन घेते असं म्हटलं जातं.

छपाक प्रदर्शित होण्यापूर्वी तीन दिवस आधी दीपिका जेएनयु कँपसमध्ये गेली होती. गुंडांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जेएनयु विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयषी घोष हिच्या शेजारी उभा असलेला दीपिकाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर दीपिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.

दीपिकाच्या अडचणीत वाढ, ‘हा’ आदेश न पाळल्यास छपाक दिसणार नाही चित्रपटगृहात

छपाकवर बहिष्कार टाकण्याची आणि विरोधाची चर्चा असताना चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत 11.67 कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी चित्रपटाने 4.77 कोटी तर शनिवारी 6.90 कोटी रुपये कमावले. रविवारी हाच आकडा 9 कोटीपर्यंत पोहचला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'प्रत्येक कुटुंब एकसारखं नसतं', दीपिकाला सासऱ्यांकडून खावा लागतो ओरडा

Published by: Suraj Yadav
First published: January 13, 2020, 10:58 AM IST

ताज्या बातम्या