'मला त्याच्यासोबत कारमध्येही बसायचं नाही', रणवीरसोबत काम करण्यावर दीपिकाचा खुलासा

'मला त्याच्यासोबत कारमध्येही बसायचं नाही', रणवीरसोबत काम करण्यावर दीपिकाचा खुलासा

रणवीरसोबत काम करण्याविषयीच्या विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना दीपिकानं चक्क, 'मला त्याच्यासोबत कारमध्येही बसायचं नाही' असं उत्तर दिलं.

  • Share this:

मुंबई, 20 ऑक्टोबर : अभिनेत्री दीपिका पदुकोण आमि रणवीर सिंह ही बॉलिवूडची सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. नेहमीच हे दोघंही काही ना काही कारणानं चर्चेत असतात. सोशल मीडिया असो वा मग एखादा इव्हेंट दीपिका-रणवीर एकमेकांचं कौतुक करताना कधीच थकत नाही. मात्र आता काहीसं उलट घडलं आहे. रणवीरसोबत काम करण्याविषयीच्या विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना दीपिकानं चक्क, 'मला त्याच्यासोबत कारमध्येही बसायचं नाही' असं उत्तर दिलं.

दीपिका पदुकोण तिच्या कामाविषयी प्रचंड जागरुक असते. नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाला रणवीरसोबत काम करतान तुझा व्यवहार कसा असतो असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दीपिका म्हणाली, रणवीर सोबत काम करताना मी कधीच त्याच्यासोबत पत्नीसारखं वागत नाही. तसेच माझा नेहमीच हा प्रयत्न असतो की आम्ही कधीच एकत्र एका कार मधून घरी जाऊ नये किंवा सेटवर एका कारमधून येऊ नये.

दिशा पाटनीसारखी परफेक्ट फिगर हवीय? मग फॉलो करा तिच्या डाएट टीप्स

जियो मामी मूव्ही मेला विथ स्टार 2019 मध्ये समीक्षक अनुपमा चोप्रा यांच्याशी बोलताना दीपिकानं अनेक मुद्द्यावर चर्चा केली. दीपिका म्हणाली,  जर तुम्ही मला आणि रणवीरला सिनेमाच्या सेटवर पाहिलं तर तिथे आम्ही सामान्यतः एकत्र नसतो. आम्ही एका कारमधून सिनेमाच्या सेटवर जात नाही. मला त्याच्यासोबत कारमध्ये बसायचंही नसतं कारण आमचं काम वेगवेगळं असतं. हे कोणत्याही उद्देशानं आम्ही करत नाही. हे फक्त एवढ्यासाठीच असतं की, जेव्हा तुम्ही एकाच सेटवर काम करता त्यावेळी इतर लोकांना तुमच्याकडून पती-पत्नी किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसारखा व्यवहार अपेक्षित नसतो.

लग्नाच्या 20 व्या वाढदिवशी माधुरी दीक्षितचा KISSING सेल्फी व्हायरल!

 

View this post on Instagram

 

& on to the next...Thank You @kabirkhankk for this incredible honour...! #RomiDev #Day1 @83thefilm @ranveersingh

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

'छपाक' सिनेमानंतर दीपिका एका डार्क रोमँटिक सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. याआधी तिनं ‘ये जवानी है दीवानी’, ‘कॉकेटल’, ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या रोमँटिक सिनेमात काम केलं होतं. चरित्रांमधील नकारात्मक पक्ष किंवा त्यांच्या रोमान्सवर आधारित असणाऱ्या सिनेमांना डार्क रोमँटिक सिनेमा म्हटलं जातं. या सिनेमाविषयी बोलतना दीपिका म्हणाली, मला एक असा सिनेमा मिळाला आहे. ज्याच शूटिंग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. हा कोणताही साधारण सिनेमा नाही. हा डार्क सिनेमा असला तरीही त्याची पार्श्वभूमि मात्र रोमँटिक आहे.

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाचा छपाका सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आह. याशिवाय कबीर खानच्या 83 मध्ये ती रणवीरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमात ती क्रिकेटर कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंह या सिनेमात क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

बलात्काराच्या आरोपाखाली दिग्दर्शकाला अटक, अनेक महिन्यांपासून करत होता 'हे' काम

==========================================================

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 11:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading