भन्साळींशी लग्न आणि रणवीरसोबत डेटिंग आवडेल - दीपिका

दीपिका सिनेमाच्या प्रमोशनच्या तयारीत आहे. याच प्रमोशनच्या निमित्ताने ती बिग बॉसच्या सेटवर गेली होती. बिग बॉसच्या सेटवर तिने आणि सलमानने चांगलीच धमाल केली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 20, 2017 01:56 PM IST

भन्साळींशी लग्न आणि रणवीरसोबत डेटिंग आवडेल - दीपिका

20 नोव्हेंबर : वेगवेगळ्या कारणांनी 'पद्मावती' सिनेमा प्रदर्शित होण्याआधी चांगलाच गाजतोय. पण असं असलं तरीही दीपिका सिनेमाच्या प्रमोशनच्या तयारीत आहे. याच प्रमोशनच्या निमित्ताने ती बिग बॉसच्या सेटवर गेली होती. बिग बॉसच्या सेटवर तिने आणि सलमानने चांगलीच धमाल केली.

या व्हिडिओमध्ये सलमान दीपिकाला प्रश्न विचारतो आणि दीपिका त्याची मजेशीर उत्तरं देताना दिसत आहे. सलमानने दीपिकाला विचारले की, ''जर तुला लग्न करायचं असेल, तुला कोणाला डेट करायचं असेल आणि जर तुला कोणाला मारायचं असेल तर तू भन्साळी, रणवीर आणि शाहीदपैकी कोणाची निवड करशील?'' त्यावर दीपिका उत्तरली की, 'ती भन्साळींसोबत लग्न करेल, रणवीर सिंहला डेट करेल आणि शाहीदला मारून टाकेन कारण त्याचं आधीच लग्न झालं आहे.'

'बिग बाॅस 11'च्या सेटवर दीपिका आली ती घूमर गाण्यावर नृत्य करतच. यावेळी सलमाननं पुन्हा पुन्हा एक गोष्ट अधोरेखित केली. सिनेमात दीपिका आणि रणवीरचं म्हणजे पद्मावती आणि खिलजीचं एकही दृश्य नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...