मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Deepa Parab : तु चाल पुढं मालिकेतील अश्विनीची पहिली झलक; दीपा परबचा सहज सुंदर अभिनय आला समोर

Deepa Parab : तु चाल पुढं मालिकेतील अश्विनीची पहिली झलक; दीपा परबचा सहज सुंदर अभिनय आला समोर

तु चाल पुढं या झी मराठीवरील नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये अश्विनीची झलक पाहायला मिळालीच मात्र आता प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोमध्ये अश्विनीची ओळखही झाली आहे. अभिनेत्री दीपा परबचा सुंदर अभिनयही पाहायला मिळत आहे.

  मुंबई, 13 ऑगस्ट : झी मराठीवर अनेक नव्या मालिका येऊ घातल्या आहेत.  बस बाई बस आणि नवा गडी नवं राज्य या मालिका नुकत्याच प्रदर्शित झाल्या असून मालिकांना प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत.  दोन्ही मालिकांचे वेगळे विषय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. तर येत्या 15 ऑगस्टपासून प्रदर्शित होणाऱ्या 'तु चाल पुढं' या मालिकेची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेच्या निमित्तानं मराठमोळी अभिनेत्री दीपा परब मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. तिच्या अभिनयाचा वेगळा चाहता वर्ग मराठी सिनेसृष्टीत आहेत. त्यामुळे तिच्या मालिकेची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत. मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होत असतली तरी मालिकेतील दीपा परबचा म्हणजे अश्विनीची पहिली झलक आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रोमोमध्ये अश्विनीची झलक पाहायला मिळालीच मात्र आता प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोमध्ये अश्विनीची ओळखही झाली आहे. तु चाल पुढं मालिकेचं प्रमोशन करण्यासाठी टीम सोशल मीडियावर अनेक प्रयोग करत आहे. कलाकार नुकतेच हवा येऊ द्याच्या मंचावरही गेले होते. मालिका सुरु होण्याआधी अश्विनी नेहाच्या घरी पोहचली आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत अश्विनीची एंट्री होणार आहे. नेहा आणि अश्विनी यांच्यातील सुंदर संवाद प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायल मिळतोय. प्रेक्षकांना हा प्रोमो प्रचंड आवडला असून प्रेक्षक प्रोमो आणि दीपा परबच्या सहज सुंदर अभिनयाचं कौतुक करत आहेत. हेही वाचा -  Mazhi Tuzhi Reshimgaath : अखेर यशसमोर येणार अविनाशचं सत्य; मालिकेत जबरदस्त ट्विस्ट
  मालिकेतील अश्विनीही तिच्या घरासाठी आणि आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी काहीतरी करु इच्छित आहे. आजच्या स्वावंलबी होणाऱ्या स्त्रियांसाठी अश्विनी येत्या काळात आदर्श असणार आहे. मालिकेचं हे कथानक प्रेक्षकांना आवडेल यात काही शंका नाही.  प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अश्विनी नेहाच्या घरी पोहोचते तिथे तिची आणि नेहाची ओळख होते. मलाही तुमच्यासारखं मोठं व्हायचं आहे, असं ती सांगते. मला हे जमेल का असंही ती सांगते. तेव्हा नेहा तिला तुम्ही जे ठरवाल ते शक्य होईल. कोणतंही काम करताना तुम्ही ते प्रामाणिकपणे कराल तर ते नक्कीच पूर्ण होईल असं सांगते. नेहा आणि अश्विनी यांची ही भेट माझी तुझी रेशीमगाठच्या उद्याच्या म्हणजेच 14 ऑगस्टच्या रविवारच्या महाएपिसोडमध्ये होणार आहे.  दीपा परब बाबत सांगायचं झालं तर तिनं या आधी  स्टार प्लस वाहिनीवर 'शौर्य और अनोखी की कहानी' या मालिकेत काम केलं आहे. मालिकेत तिनं साकारलेली 'आस्था' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.  दीपा ही मराठीतील सुपरस्टार अंकुश चौधरीची पत्नी आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या